Join us  

वयाच्या ४१ वर्षी अभिनेत्री अडकणार लग्नबंधनात? सिंगल मदर बनत करते दोन्ही मुलांचा सांभाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 8:40 PM

स्टार प्लसच्या प्रसिद्ध मालिका कसौटी जिंदगी कीमध्ये उर्वशी ढोलकिया कोमोलिकाच्या भूमिकेत दिसली होती.

टीव्ही अभिनेत्री उर्वशी ढोलकिया आहे. तुम्हाला उर्वशी ढोलकिया माहित असेलच, जिला कोमोलिका नावाने देखील ओळखले जाते. स्टार प्लसच्या प्रसिद्ध मालिका कसौटी जिंदगी कीमध्ये उर्वशी ढोलकिया कोमोलिकाच्या भूमिकेत दिसली होती. तिचा हा अभिनय लोकांना खूप आवडला होता. उर्वशी ढोलकियाने बर्‍याच टीव्ही मालिकांमध्ये हि काम केले आहे. तिने अनेक प्रकारच्या भूमिका साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

विशेष म्हणजे उर्वशीचे लग्न अवघ्या १६ व्या वर्षीच झाले होते. वयाच्या १९ व्या वर्षीच तिने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला होता. त्यानंतर पतीसोबत घटस्फोट घेत ती वेगळी झाली. त्यानंतर तिने एकटीनेच मुलांचा सांभाळ केला. पहिल्यांदाच तिने तिच्या लग्नाविषयी माहीती दिली आहे.यावर तिने सांगितले की,माझी मुलं मला नेहमीच लग्न करण्याचा किंवा कोणालातरी डेट करण्याचा सल्ला देतात. जेव्हा हे मुद्दे माझ्या समोर येतात तेव्हा मी जोरजोरात हसू लागते. काय विचार करू मी? असं नाहीये की माझं वय निघून गेलंय पण एक वेळ अशी येते जेव्हा त्या पलीकडे मी एखाद्या विषयावर जास्त विचार नाही करू शकत. 

लग्नानंतर मुलांची जबाबदारी एकटीवर आली.  मुलांचा सांभाळ करण्यात ती इतकी व्यस्त झाली की, कधीच तिने पुन्हा लग्न करण्याचा विचारच केला नाही. मुलांचे शिक्षणावर लक्ष केंद्रित केले आणि आज मुलांना स्वतःच्या बळावर तिने मोठे केलेय. कुटुंबात मुलं आणि आई वडील देखील आता उर्वशीला तिच्या आयुष्याचा विचार करायला सांगत आहे. पुन्हा एकदा लग्न करत संसार थाटण्याचे तिला सांगत आहेत. उर्वशीनेही लग्न करण्यासाठी तयार झाली आहे.

त्यामुळे नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने तिचे लग्नाचे प्लॅन सांगितले आहेत. उर्वशीला आता वयाच्या ४१ वर्षात लग्नाचे वेध लागले आहेत. माझ्या या स्वातंत्र्याचा सन्मान करणाराचा कोणी जोडीदार मला हवा आहे, तसा कोणी भेटला तर नक्कीच पुन्हा एकदा लग्नबंधनता अडकेल असेही ती म्हणाली. उर्वशी काही वर्षांपूर्वी अभिनेता अनुज सचदेवाला डेट करत होती परंतु, काही वर्षांनी त्यांचा ब्रेकअप झाले होते.

टॅग्स :उर्वशी ढोलकिया