Join us

कॅरेक्टरशी एकरूप झाले कलावंत

By admin | Updated: February 18, 2016 07:48 IST

एखादे रिअल कॅरेक्टर पडद्यावर साकारणे सोपे काम नाही. अशा अभिनयासाठी अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. रिचर्ड एटनबरोच्या ‘गांधी’मध्ये बापूची भूमिका निभवणारे ब्रिटिश अभिनेता बैंन किंग्सलेला

एखादे रिअल कॅरेक्टर पडद्यावर साकारणे सोपे काम नाही. अशा अभिनयासाठी अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. रिचर्ड एटनबरोच्या ‘गांधी’मध्ये बापूची भूमिका निभवणारे ब्रिटिश अभिनेता बैंन किंग्सलेला यांना या पात्राने अशी ओळख दिली की ते कायमचे गांधी बनून गेले. समाजाचे चांगले आणि वाईट पात्र निभविणाऱ्या कलाकारांना बऱ्याचदा चांगली आणि वाईट परिस्थितीचादेखील सामना करावा लागतो. सैफ अली खानचा चित्रपट ‘फैंटम’मध्ये पाकिस्तानी आतंकवादी हाफिज सईदचे पात्र साकारणारे काश्मिरी कलाकार शाहनवाज प्रधानला बराच काळ आपले घरदार सोडून अज्ञातवासात राहावे लागले. कारण त्यांना काही जण हाफिज सईद समजून धमकी देऊ लागले होते. चित्रपटात तर ते यशस्वी झालेत. मात्र याच भूमिके ने त्यांच्या जीवनात अनेक समस्या निर्माण केल्यात.अभिषेक शर्माचा चित्रपट ‘तेरे बिन लादेन’मध्ये ओसामा बिन लादेनचे पात्र निभविणारे दिल्लीचे कलाकार प्रद्युमन सिंहला बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागले. हे पात्र निभविल्यानंतर त्यांच्यावर असा ठपका लागला की, त्यांना पुन्हा कोणत्याच चित्रपटात काम मिळाले नाही.मुगल -ए- आझममध्ये पृथ्वीराज कपूर यांना पाहून प्रत्येकाने हे भासू लागले की, बादशाह अकबर असेच दिसत असतील. अशाच प्रकारे रामगोपाल वर्माच्या चित्रपटात दाऊदचे पात्र निभविणाऱ्या अजय देवगनची प्रशंसा झाली. परेश रावलला केतन मेहताच्या ‘सरदार’मध्ये पाहून प्रत्येकाने असे मानले की, लौहपुरुष असेच असतील. गुलजारचा चित्रपट ‘आंधी’मध्ये सुचित्रा सेनच्या पात्राचे हावभाव इंदिरा गांधींसारखेच मानले गेले.