Join us  

'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं', 'देवमाणूस' आणि 'रात्रीस खेळ चाले ३' चे आवडत्या मालिकांचे पाहायला मिळणार महाएपिसोड

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2021 7:02 PM

'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं'(Tuzya Mazya Sansarala Ani Kay Hava), 'देवमाणूस' (Devmanus २) आणि 'रात्रीस खेळ चाले ३' (Ratris Khel Chale 3) चे आवडत्या मालिकांचे महाएपिसोड पाहणे रंजक असणार आहे.

'देवमाणूस २'( Devmanus2) या मालिकेने सुरुवाती पासूनच प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. देवमाणूस पुन्हा त्याच गावात परत आला आहे पण एका वेगळ्या रूपात हा देवमाणूसच आहे हा खुलासा या विशेष भागात होणार आहे. देवमाणूस २ चा १ तासाचा विशेष भाग रात्री ९ वाजता पाहता येणार आहे. 

'रात्रीस खेळ चाले ३'(Ratris Khel Chale 3) ही मालिका देखील आता एका रंजक वळणावर आली आहे. कावेरी आणि सयाजी यांच्या माध्यमातून अण्णा आणि शेवंता एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यात वेळोवेळी असफल पण होत आहेत. त्यामुळे ते एकत्र येणार कि नाही हे प्रेक्षकांना विशेष भागात पाहायला मिळेल. रात्रीस खेळ चाले ३चा १ तासाचा विशेष भाग रात्री १० वाजता पाहाता येणार आहे.

लग्नसराई सुरु असताना मालिका तरी कशा मागे राहणार, लोकप्रिय मालिका 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं'मध्ये सिद्धार्थ आणि अदितीचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. गुळपोळीमध्ये मोठ्या कुटुंबाचं अस्सल गावाकडचं मराठी लग्नं! प्रेक्षकांना या २ तासांच्या विशेष भागातून पाहायला मिळेल. यात प्रेक्षकांना गावाकडच्या लग्नातील सगळ्या विधी, थाट आणि जल्लोष पाहायला मिळेल. तेव्हा पाहायला विसरू नका सिद्धार्थ आणि अदितीचा लग्नसोहळा विशेष भाग रविवारी दुपारी १ आणि संध्याकाळी ७ वाजता पाहता येणार आहे.छोट्या पडद्यावर 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं', 'देवमाणूस' आणि 'रात्रीस खेळ चाले ३' चे आवडत्या मालिकांचे महाएपिसोड पाहणे रंजक असणार आहे.

टॅग्स :'देवमाणूस २' मालिकारात्रीस खेळ चाले ३