Join us  

साऊथ सिनेमातील या कलाकारांचं एका सिनेमाचं मानधन वाचून व्हाल थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2018 1:37 PM

अर्थातच सिनेमाची कमाई वाढली म्हणजे अभिनेत्यांचं मानधनही वाढलं आहे. चला जाणून घेऊ तुमचे साऊथचे आवडते स्टार एका सिनेमासाठी किती मानधन घेतात. 

(Image Credit: nowboxoffice.com)

बॉलिवूडसह आता साऊथ सिनेमांची लोकप्रियताही जगभरात वाढली आहे. इतकेच काय तर साऊथचे अनेक सिनेमे हे अनेक बाबतीत बॉलिवूडच्या सिनेमांपेक्षा उजवे ठरतात. बॉलिवूडमध्ये साऊथमधील अनेक सिनेमांचे रिमेक बघायला मिळत आहेत. कारण बॉलिवूडकडे आता चांगल्या कथांचा दुष्काळ पडला की काय अशी स्थिती झाली आहे. साऊथचे सिनेमे आता घराघरात बघितले जाऊ लागले आहे. त्यामुळे त्यांची कमाईही वाढली आहे. अर्थातच सिनेमाची कमाई वाढली म्हणजे अभिनेत्यांचं मानधनही वाढलं आहे. चला जाणून घेऊ तुमचे साऊथचे आवडते स्टार एका सिनेमासाठी किती मानधन घेतात. 

रामचरण तेजा

तेलगु सिनेमांचा सुपरस्टार रामचरण तेजा एका सिनेमासाठी तब्बल १२ कोटी रूपये मानधन घेतो. आधी हे मानधन फार कमी होतं. 

विक्रम

तमिळ सिनेमातील लोकप्रिय झालेला विक्रम तिकडे मुख्य अभिनेत्यांपैकी एक आहे. विक्रम एका सिनेमासाठी १२ ते १५ कोटी रूपये मानधन घेतो.  

सूर्या

सूर्या सुद्धा तमिळ सिनेमातील एक लोकप्रिय चेहरा आहे. इतक्यात त्याचा कोणताही मोठा सिनेमा आलेला नाही. पण त्याची लोकप्रियता इतकी आहे की, तो एका सिनेमासाठी १७ कोटी रूपये घेतो. 

महेश बाबू

तेलगु सिने इंडस्ट्रीतील हॅन्डसम स्टार महेश बाबू सुद्धा सर्वात महागडा अभिनेता आहे. तो एका सिनेमासाठी १६ कोटी रूपये मानधन घेतो. 

पवन कल्याण

अभिनेता पवन कल्याणही मानधनाच्या बाबतीत मागे नाहीये. तो एका सिनेमासाठी चक्क १८ कोटी रूपये मानधन घेतो. 

प्रभास

बाहुबली फेम प्रभास हा किती लोकप्रिय आहे हे कुणाला वेगळं सांगण्याची गरज नाही. बाहुबलीनंतर प्रभास आता एका सिनेमासाठी २० कोटी रूपये मानधन घेतो. 

अजीत

तमिळ सिनेमांचा सुपरस्टार अजीत हा एका सिनेमासाठी २० ते २५ कोटी रूपये मानधन घेतो. 

विजय 

तमिळ अभिनेता विजय हा अनेक अभिनेत्यांच्या पुढे आहे. एका वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, विजय एका सिनेमासाठी तब्बल ३० कोटी रूपये मानधन घेतो. 

रजनीकांत

रजनीकांत हे असे अभिनेते आहेत ज्यांच्या केवळ नावानेच सिनेमा सुपरहिट होतो. त्यामुळे अर्थातच ते मानधनाच्या बाबतीतही सर्वांच्या पुढे आहेत. रजनीकांत हे एका सिनेमासाठी तब्बल ४० ते ६० कोटी रूपये मानधन घेतात.