शहंशाह अमिताभ बच्चन आणि मि. परफेक्शनिस्ट आमीर खान हे दोन दिग्गज प्रथमच एका चित्रपटात दिसणार आहेत. ‘ठग्स आॅफ हिंदुस्तान’ असे नाव असलेला हा चित्रपट पुढच्या दिवाळीत प्रदर्शित होणार असल्याची माहिती यशराज बॅनरने दिली आहे. सिनेमात मुख्य अभिनेत्री कोण असणार याबाबत मात्र गुप्तता बाळगण्यात आली आहे. ‘धूम ३’नंतर आमिर पुन्हा एकदा दिग्दर्शक विजय कृष्णा आचार्यसोबत या चित्रपटात काम करणार आहे. पूर्वीचे केवळ ‘ठग’ असे नाव बदलून आता ‘ठग्स आॅफ हिंदूस्तान’ असे ठेवण्यात आले आहे. जाहीर केलेल्या पत्रकात वायआरएफने म्हटले आहे की, ‘आमिर-अमिताभ एकत्र येत आहेत हीच चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठी गोष्ट आहे. याव्यतिरिक्त आणखीदेखील अनेक सरप्राईजेस आम्ही पुढच्या काही दिवसांत देणार आहोत. मुख्य अभिनेत्रीचे नाव लवकरच घोषित करण्यात येईल.
‘ठग्स आॅफ हिंदुस्तान’ येणार पुढच्या दिवाळीला!
By admin | Updated: September 10, 2016 02:05 IST