Join us  

सामान्य माणसाची गोष्ट

By admin | Published: November 28, 2014 11:18 PM

काही वर्षापूर्वी आमीर खान प्रोडक्शनचा ‘पीपली लाइव्ह’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यात गावातला सामान्य माणूस गरिबीला कंटाळून आत्महत्या करण्याची घोषणा करतो.

काही वर्षापूर्वी आमीर खान प्रोडक्शनचा ‘पीपली लाइव्ह’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यात गावातला सामान्य माणूस गरिबीला कंटाळून आत्महत्या करण्याची घोषणा करतो. त्यामुळे मीडियापासून राजकारणार्पयत सगळीकडे भ्रष्ट व्यवस्थेवरून  खूप चर्चा होते, असे दाखवले होते. डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांचा ‘ङोड प्लस’ हाही याच वळणाचा आहे. एका सामान्य माणसाच्या नादात राजकारणी आणि पर्यायाने देशव्यवस्थेवर वाईट परिणाम होतो. राजकारणातल्या व्यवस्थेवर उपहासाने प्रहार करणारे ‘पीपली लाइव्ह’ आणि ‘ङोड प्लस’ हे दोन्ही चित्रपट देशातल्या लोकतांत्रिक आणि राजकीय व्यवस्थेचे पितळ उघडे पाडतात. 
राजस्थानच्या फतेहपूर सिक्री गावात चित्रपट घडतो. या गावात छोटेसे गॅरेज चालवत आपल्या कुटुंबासह राहणारा अस्लम (आदिल हुसैन). एकेदिवशी गावातल्या पीर बाबाच्या दग्र्यावर अस्लमला खादिम बनण्याची संधी मिळते. त्याच दिवशी देशातले पंतप्रधान त्या दग्र्यावर येतात. दिल्लीत त्यांचे सरकार अडचणीत असते. पीर बाबाच्या दग्र्यावर आल्यानंतर चमत्कार होऊन त्यांचे सरकार वाचते. खादिमला जेव्हा पंतप्रधानांकडे काहीतरी मागण्याची संधी मिळते तेव्हा तो खूप घाबरतो. अस्लम त्याच्या शेजारच्याशी सतत चाललेल्या वादांमुळे वैतागलेला असल्याने त्याचीच तक्रार पंतप्रधानांकडे करतो. पंतप्रधानांना हिंदी कळत नसते. त्यामुळे शेजारच्याची तक्रार ते शेजारच्या पाकिस्तानशी जोडून त्यांच्याकडून अस्लमला धोका असल्याचा ग्रह करून घेतात. त्यानंतर पंतप्रधानांच्या आदेशावरून अस्लमला केंद्र सरकारकडून ङोड दर्जाची सुरक्षा व्यवस्था मिळते. पंतप्रधानांच्या सचिवाच्या दबावामुळे अस्लम मीडियाला आणि सगळ्यांनाच पाकिस्तानकडून धमकी मिळाल्याने आपल्याला ही सुरक्षा मिळाल्याचे सांगतो. लवकरच या सुरक्षा व्यवस्थेचे दुष्परिणामही अस्लमला दिसू लागतात. त्याला या सुरक्षेमुळे आपल्या प्रेयसीला भेटणोही मुश्कील होते. तर दुसरीकडे अस्लममुळे राजकारणही तापते. राजस्थान सरकार त्याला निवडणुका लढवण्यासाठी दबाव टाकते. तर केंद्र सरकारमधील ज्येष्ठ अधिकारी शाह आपली नोकरी वाचवण्यासाठी अस्लमवर गोळ्या चालवण्यासही मागे-पुढे पाहत नाही. या सुरक्षेमुळे अस्लम खूपच वैतागतो. निवडणुकांमध्येही त्याचा वापर केला जातो. पण सामान्य माणूस अशी धरपकड सहन करूच शकत नाही. तो ही सुरक्षा व्यवस्था भेदतो. त्या वेळी देशाची व्यवस्था आणि राजकारणाचा भ्रष्ट चेहरा समोर येत जातो.
वैशिष्टय़े - 9क्च्या आसपास केंद्रातल्या राजकारणावर राजकुमार चौहान यांनी कादंबरी लिहिली होती. डॉ. द्विवेदी यांची कथा याच पुस्तकावर आधारित आहे. गरिबी आणि मजबुरीत अडकून सामान्य माणूस कसा आपला चरितार्थ चालवतो हे दाखवण्याबरोबरच देशातल्या पंतप्रधानांपासून पूर्ण सरकारी व्यवस्था कशी भ्रष्ट होत चालली आहे, त्याची झलक या चित्रपटात अत्यंत प्रभावीपणो दाखवली आहे. छोटे संवाद आणि दृश्ये चित्रपट परिणामकारक बनवतात. कलाकारांनीही उत्कृष्ट अभिनय केला आहे. अस्लमच्या भूमिकेतील आदिल हुसेनने तर संमोहित केले आहे. त्यांनी ही भूमिका अतिशय प्रभावीपणो केली आहे. प्रत्येक दृश्यात त्याने बाजी मारली आहे. त्याच्या पत्नीच्या भूमिकेतील मोना सिंगनेही छान काम केले आहे. तर साहाय्यक भूमिकांमधील मुकेश तिवारी, कुलभूषण खरबंदा, राजीव सिंह, के.के. रैना यांनीही प्रभाव पाडला आहे. दिग्दर्शक म्हणून आपले म्हणणो यथार्थपणो पोहोचवण्यात डॉ. द्विवेदी यशस्वी ठरले आहेत. 
उणिवा - चित्रपट चांगला असला तरीही त्यात अनेक उणिवा आहेत. द्विवेदी त्याच्या गतीवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरले आहेत. चित्रपट उगाचच ताणला गेल्याने नंतर नंतर त्यात उणिवा जाणवायला लागतात. अस्लमच्या भूमिकेतील सहजता आसपासच्या घटनांना कठीण करायचे काम करतात. अस्लमचे शेजारच्याशी भांडण, परिसरातल्या इतर लोकांचे विचार, निवडणुका आणि दिल्लीतल्या लोकांशी त्याचे संवाद आणि अस्लमला मारायला आलेल्या दोन मुलांचा ट्रॅक हे सगळे अनावश्यक वाटते. तसेच हृषिता भट्टलाही जबरदस्तीने चित्रपटात घेतल्याचे वाटते. ती ग्लॅमरची गरजही पूर्ण करत नाही. तसेच संजय मिश्रसारख्या कलाकारालाही वाया घालवले आहे. संगीत अत्यंत वाईट असून जबरदस्तीने पेरल्यासारखे वाटते. अस्लम आणि त्याच्या प्रेयसीमधील चुंबनदृश्यांचा अतिवापर टाळता येऊ शकला असता. चित्रपटाची गती आणि काही गोष्टी ध्यानात ठेवल्या असता तर चित्रपट आणखी प्रभावी होऊ शकला असता.