Join us
Daily Top 2Weekly Top 5

'भेटशी नव्याने' मालिका घेतेय प्रेक्षकांचा निरोप, सुबोध भावे म्हणाला - अभिमन्यूच्या भूमिकेनं मला....

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 16:04 IST

Tu Bhetashi Navyani Serial : अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री शिवानी सोनार यांची 'तू भेटशी नव्याने' ही मालिका यावर्षी जुलै महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला आली. आता अवघ्या पाच महिन्यांनी मालिका बंद होतेय.

अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) आणि अभिनेत्री शिवानी सोनार (Shivani Sonar) यांची 'तू भेटशी नव्याने' (Tu Bhetashi Navyane) ही मालिका यावर्षी जुलै महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला आली. मालिकेमध्ये केलेला AI तंत्रज्ञानाचा वापर केला होता.सुबोधने साकारलेल्या अभिमन्यू या पात्राचे २५ वर्षांपूर्वीचे व्हर्जन AI च्या मदतीने तयार करण्यात आले होते. मराठी मालिका विश्वात पहिल्यांदाच असा प्रयोग झाला होता. या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळतो आहे. मात्र आता अवघ्या पाच महिन्यांनी मालिका बंद होतेय. आज या मालिकेचा शेवटचा एपिसोड प्रसारीत होणार आहे. या मालिकेची सांगता होत असताना अभिमन्यू म्हणजेच अभिनेता सुबोध भावेने भावना व्यक्त केल्या आहेत.

सुबोध भावे म्हणाला की, मला या मालिकेनं चांगली माणसं दिली. चांगलं युनिट दिले. ज्यांच्यासोबत मी खूप वर्षांनी काम करत होतो तर काहींसोबत पहिल्यांदा काम केले. मला असे वाटते मालिका तुमच्या आयुष्यात वेगवेगळ्या गोष्टी घेऊन येत असते. पण त्यातली माणसे आयुष्यभरासाठी जोडली जातात.त्या माणसांसोबत केलेले काम प्रेक्षकांसोबत जोडले जात असतात. या मालिकेने ही माणसं मिळवून दिली. 

या गोष्टी करेन मिस

या सेटवर सगळ्यात जास्त कोणती गोष्ट मिस करणार, असे विचारल्यावर सुबोध भावे म्हणाला की, या मालिकेतील पेन ही गोष्ट खूप मिस करेन. हे पेन अभिमन्यूचे आहे. त्यात त्याची आत्मा आहे, असे मला वाटते. शूटच्या पहिला दिवस ते शेवटच्या दिवसापर्यंत या पेनने माझी साथ सोडलेली नाही. या पेनाशिवाय मी एकही सीन केलेला नाही. माझी मेकअप रुम मिस करेन आणि बिबिंसार ते घोडबंदर हा प्रवास मिस करेन. अर्थात सेटवरील माणसे मिस करेन.

सर्वोत्तम आठवणीबद्दल सांगताना सुबोध म्हणाला की, प्रत्येक जण आयुष्यात कधी ना कधी कोणाच्या तरी प्रेमात पडलेला असतो आणि ती प्रेमाची भावना जेव्हा जेव्हा आठवते तेव्हा तेव्हा जग सुंदर वाटायला लागते. अभिमन्यूच्या भूमिकेने हे मला दिले आहे. एक अत्यंत मनापासून प्रेम करणारा व्यक्ती माझ्या आयुष्यात त्याने आणला, जो त्या प्रेमातून बाहेरच आलेला नाही.

टॅग्स :सुबोध भावे