'The Kashmir Files' Vivek Agnihotri : द काश्मीर फाईल्स या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर (Box Office) जबरदस्त कमाई केली आहे. पब्लिक आणि क्रिटिक्स दोन्हीकडून या चित्रपटाला चांगला रिस्पॉन्स मिळतो. अनेकांनी या चित्रपटात मांडलेल्या विषयाचं आणि चित्रपटाच्या मांडणीचंही कौतुक केलंय. ऑडियन्स वोटिंगच्या आधारावरच या चित्रपटाला 9.9/10 IMDb रेटिंग मिळालं होतं. परंतु काही दिवसांनी हे रेटिंग कमी झालं. यावर चित्रपटाते दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
काश्मीर फाईल्स या चित्रपटाला IMDb वर 9.9/10 इतकं रेटिंग देण्यात आलं होतं. परंतु यानंतर रेटिंग सिस्टममध्ये बदल करण्यात आला आणि आता या चित्रपटाला 8.3/10 इतकं रेटिंग देण्यात आलं. आमच्या रेटिंग यंत्रणेला या शीर्षकावर संशयास्पद क्रियाकलाप आढळला आहे. आमच्या रेटिंग सिस्टमचा प्रामाणिकपणा काय राखण्यासाठी आम्ही आणखी एक निकष लागू केला आहे, असं काश्मीर फाईल्सच्या IMDb पेजवर लिहिण्यात आलंय.