Join us  

'शासनाने तुमची दखल गांभीर्याने घेतली नाही'; शाहीर साबळेंसाठी केदार शिंदेची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2023 6:00 PM

Kedar shinde: केदार शिंदेची पोस्ट सध्या चर्चेत येत आहे.

मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणजे केदार शिंदे (kedar shinde). आजवरच्या कारकिर्दीत केदार शिंदे यांनी अनेक गाजलेल्या मालिका, सिनेमा मराठी कलाविश्वाला दिले आहेत. त्यामुळे त्यांची सोशल मीडियावर कायमच चर्चा रंगत असते. यात सध्या त्यांच्या बाईपण भारी देवा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुसाट कमाई करत आहे. विशेष म्हणजे नुकताच त्यांचा महाराष्ट्र शाहीर हा सिनेमाही प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर त्यांनी शाहीर साबळे यांच्या आठवणीत एक पोस्ट शेअर केली आहे.

"बाबा.. शाहीर साबळे.. ३ सप्टेंबर हा तुमचा जन्मदिवस. आज जन्मशताब्दी वर्षाची सांगता होईल. मी २०१९ मध्ये जे ठरवलं ते स्वामी कृपेने पुर्ण झालं. तुमच्या आयुष्याचं documentation झालं. @amazonprime ला आज "महाराष्ट्र शाहीर" सिनेमा उपलब्ध आहे. पुढच्या कित्येक पिढ्या तुम्हाला विसरणार नाहीत याची खबरदारी घेतली आहे. @everestentertainment @sanjayof69 @ankushpchaudhari यांच्या मदतीने हे शक्य झालं. शासनाने तुमची दखल गांभीर्याने घेतली नाही याचं शल्य आयुष्यभर मनात राहील. पण कुणावर का अवलंबून रहायचं? याची शिकवण याच काळात मिळाली. मी पुढे दिग्दर्शक म्हणून कसा आहे?? हे सांगणं मला अवघड असलं तरी, मी शाहीरांचा नातु म्हणून कसा आहे? याविषयी लोकं भरभरून बोलतील याची खात्री आहे.. माझ्या आजोबांनी महाराष्ट्रासाठी काय केलं? यासाठी एक सिनेमा पाहिला तरी समजून येईल.. माझी नातवंड जेव्हा विचार करतील की, आपल्या आजोबांनी काय केलं? त्यांच्यासाठी बस्स एक तुमचा सिनेमा पाहिला तरी खुप झालं!!!, अशी पोस्ट केदार शिंदे यांनी शेअर केली आहे.

दरम्यान, केदार शिंदे हे शाहीर साबळे यांचे नातू असून त्यांनी त्यांच्या आजोबांचा जीवनप्रवास, त्यांचं समाजकार्य महाराष्ट्र शाहीर या सिनेमातून प्रेक्षकांसमोर आणलं.' जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ' हे गीत महाराष्ट्राच्या कानाकोप-यात शाहीर साबळे यांनी पोहोचवलं होतं. 

टॅग्स :केदार शिंदेसेलिब्रिटीसिनेमा