Join us  

रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये शूर्पणखेची भूमिका साकारणार ही अभिनेत्री, लवकरच ती अडकणारेय लग्नबेडीत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2024 4:38 PM

नितेश तिवारींचा रामायण (Ramayana) बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. रणबीर कपूर 'राम'च्या भूमिकेत दिसणार असल्याचे सर्वश्रुत आहे, त्यासाठी त्याने कामही सुरू केले आहे. या चित्रपटातील 'सीता'च्या भूमिकेसाठी सई पल्लवी आणि जान्हवी कपूरची नावे पुढे येत आहेत.

नितेश तिवारींचा रामायण (Ramayana) बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. रणबीर कपूर 'राम'च्या भूमिकेत दिसणार असल्याचे सर्वश्रुत आहे, त्यासाठी त्याने कामही सुरू केले आहे. या चित्रपटातील 'सीता'च्या भूमिकेसाठी सई पल्लवी आणि जान्हवी कपूरची नावे पुढे येत आहेत. यशला 'रावण' तर सनी देओलला 'हनुमान'ची भूमिका मिळाली आहे. या चित्रपटात 'शूर्पणखा'ची भूमिकेत कोणती अभिनेत्री झळकणार याच्या अनेक चर्चा सुरू होत्या, मात्र आता त्या अभिनेत्रीचे नावही फायनल झाल्याचे वृत्त आहे.

नितेश तिवारी यांना त्यांच्या रामायणासाठी 'शूर्पणखा' सापडली आहे. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, लवकरच होणारी नववधू रकुल प्रीत सिंगसोबत निर्मात्यांचे बोलणे झाले आहे. वास्तविक, रकुल आणि नितेश यांच्यात काही दिवसांपासून चर्चा होती आणि आता 'शूर्पणखा'साठी कास्टिंग करण्यात आले आहे. ती रामायणातील सर्वात महत्त्वाच्या पात्रांपैकी एक आहे, कारण 'शूर्पणखा' ही भगवान राम आणि रावण यांच्यातील युद्धासाठी जबाबदार होती.

अधिकृत घोषणेच्या प्रतीक्षेतमात्र, निर्माते किंवा रकुल प्रीत सिंग यांनी अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. या बातम्यांनंतर आता चाहते निर्मात्यांच्या अधिकृत घोषणेची वाट पाहत आहेत. जर वृत्तांवर विश्वास ठेवला तर, रकुलने या पात्राची लुक टेस्ट आधीच केली आहे आणि जर सर्वकाही योजनेनुसार झाले तर, रामायण हा पहिला चित्रपट असेल ज्यासाठी ती जॅकी भगनानीसोबत लग्नानंतर शूटिंग सुरू करेल.

रकुल प्रीत आणि जॅकीचे लग्न कधी?रकुल प्रीत सिंग अभिनेता जॅकी भगनानीसोबत लग्न करणार आहे. रिपोर्ट्सनुसार, जॅकी भगनानी आणि रकुल प्रीत सिंह यांचा विवाह २१ फेब्रुवारी २०२४ रोजी गोव्यात होणार आहे. या लग्नात फक्त दोघांचे कुटुंबीय आणि जवळचे लोक हजेरी लावणार आहेत.

टॅग्स :रामायणरकुल प्रीत सिंग