Join us

'आई कुठे काय करते' मालिकेत या अभिनेत्रीनं केलं कमबॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 13:57 IST

Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे.

आई कुठे काय करते मालिकेच्या कथानकाने आणि नवनवीन ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते आहे. सध्या ही मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. संजनाने देशमुखांचा समृद्धी बंगला स्वतःच्या नावावर केला आहे, हे समजल्यावर सर्वजण तिच्यावर नाराज झाले आहेत. दरम्यान आता या मालिकेतील या अभिनेत्रीने कमबॅक केले आहे. ही अभिनेत्री कोण आहे, हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल ना. तर या मालिकेत विमलची भूमिका साकारणारी अभिनेत्री सीमा घोगळेचे कमबॅक केले आहे. नुकत्याच प्रसारीत झालेल्या भागात ती पाहायला मिळाली.

आई कुठे काय करते मालिकेत विमलची भूमिका अभिनेत्री सीमा घोगळे हिने साकारली आहे. काही दिवसांपूर्वी सीमाने ही मालिका सोडली असल्याचे बोलले जात होते. सोनी मराठी वाहिनीवरील बॉस माझी लाडाची या मालिकेमुळे सीमाने ही मालिका सोडली असल्याचे सांगितले जात होते. त्यानंतर बरेच दिवस सीमा मालिकेत पाहायला मिळाली नव्हती. मात्र सीमा घोगळेने मालिकेत कमबॅक केले आहे. नुकत्याच प्रसारीत झालेल्या भागात सीमा घोगळे पाहायला मिळाली.

सीमा घोगळे अभिनेत्रीसोबत उत्तम नृत्यांगणा आहे. तिने याआधीही काही मालिका आणि नाटकांमध्ये काम केले आहे. सोशल मीडियावर सीमाचा खूप मोठा फॅन फॉलोव्हिंग आहे. खऱ्या आयुष्यात सीमा खूपच ग्लॅमरस आहे. तिच्या सोशल मीडियावरील फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळताना दिसते.    

टॅग्स :आई कुठे काय करते मालिका