Join us

'फुलपाखरू' मालिकेत मानसवर ओढावले संकट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 14:41 IST

एके दिवशी मानस वैदेहीशी फोनवर बोलत असताना त्याला अचानक एक ट्रक उडवतो आणि मानसचा अपघात होतो. हा अपघात मानसला जीवे मारण्यासाठी करण्यात आला आहे का? कुलदीप या सगळ्याच्या मागे तर नसेल ना?अशा अनेक प्रश्न मालिकेत येणा-या भागाता उलगडणार आहेत.

छोट्या पडद्यावरील 'फुलपाखरू' ही मालिका आणि मालिकेतील प्रत्येक भूमिकेला रसिकांच्या अल्पावधीतच पसंतीस पात्र ठरली. मानस आणि वैदेही ही पात्र तर त्यांच्या मनात घर करून बसली आहेत. नुकतंच मालिकेत रसिकांनी मानस आणि वैदेहीच्या लग्नाचा सोहळा पाहिला. तिथूनच या मालिकेला नवीन वळण मिळाले. नव्या नात्याचा खरा प्रवासात अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहेत.

 

सध्या मालिकेत रसिक मानस आणि वैदेहीच्या नव्या संसाराचा प्रवास पाहत आहेत. लग्नानंतर मानस पुन्हा ऑफिसला रुजू झाला आहे. दिवसभर कामात व्यस्त असल्यामुळे मानस घरी आल्यावरच वैदेहीला वेळ देऊ शकत आहे. कुलदीपने मानस आणि वैदेहीच्या लग्नात देखील अनेक प्रॉब्लेम्स निर्माण केले आणि आता देखील त्याच्या मनात त्या दोघांविषयी कपट आहे. त्याच्या एकंदरीत वागण्याचा वैदेहीला संशय येतोय. कुलदीप मानसला उध्वस्त करण्यामागे आहे.एके दिवशी मानस वैदेहीशी फोनवर बोलत असताना त्याला अचानक एक ट्रक उडवतो आणि मानसचा अपघात होतो. हा अपघात मानसला जीवे मारण्यासाठी करण्यात आला आहे का? कुलदीप या सगळ्याच्या मागे तर नसेल ना?अशा अनेक प्रश्न मालिकेत उलगडण्यात येणार आहेत.

 

या मालिकेने नुकताच ४०० भागांचा यशस्वी टप्पा पार केला आहे. ४०० भागांचा माईलस्टोन पार केल्यानंतर सेलिब्रेशन तर जोरातच होणार आणि त्यांनी हा आनंद मालिकेच्या सेटवर केक कापून साजरा केला. यावेळी फुलपाखरू मालिकेची संपूर्ण टीम सेटवर उपस्थित होती.  याविषयी बोलताना, हृता दुर्गुळे सांगते ४०० भागांचा यशस्वी टप्पा गाठणे हा आम्हा सर्वांसाठीच खूप आनंदाची गोष्ट आहे. फुलपाखरू या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आणि त्यामुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो आणि म्हणूनच हा आनंद आम्ही फुलपाखरूच्या संपूर्ण टीमसोबत साजरा केला. या आनंदाच्या क्षणी मी रसिक प्रेक्षकांचे आभार मानू इच्छितो. ज्यांनी आमच्यावर इतकं प्रेम केलं आणि ती पुढेही आमची अशीच साथ देतील अशी आशा करते."