Join us

​मुंबईकरांसाठी ठाण्यात थिरकणार झी युवाचा ' डान्स महाराष्ट्र डान्स'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2017 10:23 IST

नागपूर, औरंगाबाद,  नाशिक ,पुणे  आणि कोल्हापूर  मधील स्पर्धकांच्या अभूतपूर्व प्रतिसादांनंतर झी युवाची डान्स महाराष्ट्र डान्सची टीम आता मुंबई मध्ये  ...

नागपूर, औरंगाबाद,  नाशिक ,पुणे  आणि कोल्हापूर  मधील स्पर्धकांच्या अभूतपूर्व प्रतिसादांनंतर झी युवाची डान्स महाराष्ट्र डान्सची टीम आता मुंबई मध्ये  दाखल झाली आहे. या ऑडिशन गुरुवार २८ डिसेंबर रोजी सकाळी 8 ते दुपारी 2 या दरम्यान सतीश प्रधान ज्ञानसाधना कॉलेज, इटर्निटी मॉल जवळ ज्ञानसाधना मार्ग पूर्व द्रुतगती मार्ग जवळ ठाणे पश्चिम येथे होणार आहेत. ज्या प्रमाणे इतर शहरांमधील गुणी स्पर्धक निवडले गेले त्याचप्रमाणे मुंबईतील कलेची योग्य पारख करून झी युवा डान्स महाराष्ट्र डान्स च्या स्पर्धेची निवड प्रक्रिया पूर्ण करेल.या ऑडिशनमध्ये ४ वर्षांवरील कोणत्याही वयोगटातील स्पर्धक सहभागी होऊ शकणार आहेत. स्पर्धेला जसे वयाचे बंधन नाही तसेच विशिष्ट नृत्यप्रकारचेही बंधन नसेल. यात तुम्ही एकटे, जोडीदारासोबत किंवा पूर्ण ग्रुपसोबतही सहभागी होऊ शकता. वेगवेगळ्या पाश्चिमात्य डान्स स्टाइल्सला मराठमोळा तडका देऊन नृत्याविष्कार सादर करणे हे या शोचे वैशिष्ट्य असेल. मनासोबत नृत्यातूनही मराठीपणाची भावना रुजवण्याचा प्रयत्न यानिमित्ताने पहिल्यांदाच टेलिव्हिजनवर होणार आहे. यात सहभागी होण्यासाठी कोणतेही बंधन नसल्याने उत्तम प्रतिसाद मिळेल अशी आम्हाला आशा आहे.महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये आयुष्य कितीही सुपरफास्ट असलं तरीही  कसलेल्या कलाकारांपासून दर्दी रसिकांपर्यंतच्या कित्येक पिढ्या मुंबईच्या मातीत घडल्या आहेत. पट्टीच्या कलाकाराला तितक्याच आत्मीयतेने दाद देणारा रसिक मुंबई मध्ये  हमखास असतोच. अशा हरहुन्नरी कलाकारांची मांदियाळी असलेल्या मुंबईतील डान्सच्या वेडाने झपाटलेल्या मुंबईकरांना डान्स महाराष्ट्र डान्सच्या मंचावर नृत्यकौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे. युवकांच्या आवडीची नस पकडणाऱ्या झी युवावर लवकरच डान्स महाराष्ट्र डान्स हा सळसळता कार्यक्रम दाखल होणार आहे.  महाराष्ट्रातील अनेक कलाकार त्यांना मिळणाऱ्या प्रत्येक संधीच सोने करण्याची वाट पाहत असतात. मात्र अशा संधी फार कमी येतात. महाराष्टातील प्रेक्षकांनी संगीत सम्राट या कार्यक्रमाला अतिशय उस्फुर्त प्रतिसाद दिला. महाराष्ट्रातील गायकीला त्यामुळे एक वेगळा दर्जा मिळाला. नृत्यावर आधारित रिअॅलिटी शोच्या या गर्दीत 'डान्स महाराष्ट्र डान्स' या कार्यक्रमाने स्वतःची एक वेगळी ओळख बनवली आहे. डान्स म्हणजे स्वातंत्र्य, डान्स म्हणजे नजाकत, डान्स म्हणजे भावना आणि डान्स म्हणजे बेभानता. बेभान होऊन नाचताना त्या नृत्याला जेव्हा मराठमोळा स्पर्श असेल तेव्हा त्याची मजा काही निराळीच असेल. हीच खासियत असणार आहे झी युवावर सुरु होणाऱ्या 'डान्स महाराष्ट्र डान्स' या रिऍलिटी शोची. तमाम मराठी प्रेक्षकांना स्वतःत असलेले नृत्यगुण जगासमोर आणण्याची संधी या कार्यक्रमातून मिळणार आहे.