Join us  

झी युवा वरील अंजली मालिकेत अवयव दानाबद्दल जागरूकता !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2018 12:05 PM

जन्माला आलेला प्रत्येकजण कधी ना कधीतरी मरणारच असतो.कधी तरी कोणाच्या तरी अवेळी जाण्याची बातमी आपण पेपर मधे वाचतो हळहळतो, ...

जन्माला आलेला प्रत्येकजण कधी ना कधीतरी मरणारच असतो.कधी तरी कोणाच्या तरी अवेळी जाण्याची बातमी आपण पेपर मधे वाचतो हळहळतो, लाईफ इज अनसर्टन म्हणतो. एक उसासा टाकतो. पुन्हा रोजच्या गतीने श्वासोच्छ्वासाची लय पकडून आपला मार्ग चालू लागतो आपल्या मागे आपल्या कुटूंबाची सोय करुन ठेवायला हवी ह्या जाणीवेने कुठल्या कुठल्या पॉलीसीज घेतो. फायनान्सची कॅलक्युलेशन्स करतो. पुन्हा एकदा आपला पेस पकडून चालायला लागतोहजारोंच्या की लाखोंच्या संख्येने रोज कोणी ना कोणी कुठच्या ना कुठच्या जीवघेण्या आजाराशी झुंजत असतो. डॉक्टर "डोनर" कोणी मिळाला तर जगायचे क्षण वाढतील असं निदान करतात. जेव्हा आपण किंवा आपलं कोणी त्या जागी असतं तेव्हा "डोनर" मिळवायला आपण जीवाचं रान करतो.लाईफ इज अन्सर्टन पुन्हा एकदा जाणवून जातं. जगात अमुक इतके अंध आहेत, अमुक इतकी लोकसंख्या आहे. अमुक इतक्यांनी नेत्र दान केलं तर तमुक इतक्या दिवसात जगातलं अंधत्व लोप पावेल अशा अर्थाचे इमेल्स फ़ॉरवर्ड वर फ़ॉर्वर्ड करतो. हे सर्वाना ठाऊक आहे,  असं इमेल्स फ़ॉरवर्ड करुन काही होत असतं तर आत्ता पर्यंत बरच काही झालं असतं तरीही आपण ते करतो. का? जगात अनेक संस्था ऑर्गन डोनेशन म्हणजेच अवयव दान यावर काम करतात.  जसं नेत्र दान करता येतं, तसच हृदय, यकृत, किडनी, पॅनक्रियाज, इंटेस्टाईन, फुफ्फुस, आणि त्वचा दान देखील करता येतं.अर्थात वरील पैकी त्वचा आणि नेत्र दान सोडता बाकीच्या गोष्टी ब्रेन डेड अवस्थेतील पेशंट्च दान करु शकतो. किडनी, यकृताचा काही भाग हा जीवित व्यक्ती देखील दान करु शकते पण त्यासाठीचे नियम वेगळे आहेत. या सर्व गोष्टींची माहिती लोकांना व्हावी या साठीच झी युवा वरील अंजली या मालिकेमध्ये ऑर्गन डोनेशन वर एक ट्रॅक दाखवण्यात आला. या ट्रॅक मध्ये एका पेशंट ला ऑर्गन हवे असते पण ते मिळत नसते , पण कुठेतरी कोणीतरी मरते आणि केवळ त्या व्यक्तीने ऑर्गन डोनेट केले असल्यामुळेच या पेशंट ला जीवनदान मिळते . त्याच्या घरच्यांनाही त्या पेशंटला जीवनदान मिळाल्यामुळे आणि आपल्या व्यक्तीचा एक अवयव अजूनही आपल्या जवळपास आहे हे समाधान मिळते.  या ट्रॅकबद्दल सुरुची अडारकर हिला विचारले असता ती म्हणाली , "आपण गेल्यावर आपले देता येण्यासारखे अवयव दान देऊन आपण काही व्यक्तींना जीवनदान देऊ शकलो तर त्यापेक्षा अधिक आनंदाचे असे काय असेल? असे केल्यानंतर देखील तुमच्या पार्थिवाचे तुमच्या धर्मात लिहिल्याप्रमाणे अंत्यसंस्कार करता येतातच , तेव्हा धार्मिक क्रियाकर्म शक्य होतील का नाही हा विचार मनात येत असेल तर त्याच उत्तर निश्चीतच तुमच्या तुमच्या धर्मात लिहिल्याप्रमाणे अंत्यविधी करता येतील असच आहे. मुळात अशी इच्छा व्यक्त करुन डोनर कार्ड भरणे खूप महत्वाचे असते  आपली इच्छा नोंदवून तसे आपल्या जवळच्या कुटूंबियांस सांगणे केव्हाही योग्यच.मी सुद्धा माझे ऑर्गन डोनेट करणार आहे आणि माझी विनंती आहे कि तुम्ही सुद्धा आपले ऑर्गन डोनेट करण्याबद्दल विचार करावा . अवयव दान म्हणजेच जीवनदान . "