Join us

झहीदा परवीन सिया के राममध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2016 16:33 IST

पुनर्विवाह या मालिकेत झळकलेली अभिनेत्री झहीदा परवीन आता सिया के राम या मालिकेत काम करणार आहे. झहीदा या मालिकेत ...

पुनर्विवाह या मालिकेत झळकलेली अभिनेत्री झहीदा परवीन आता सिया के राम या मालिकेत काम करणार आहे. झहीदा या मालिकेत त्रिजिदा ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. त्रिजिजा ही राक्षसीण असून सीतेला पळवून आणल्यानंतर तिची काळजी घेण्यासाठी तिची रावण निवड करतो असे आपण रामायणामध्ये ऐकलेलेच आहे. झहीदा गेली अनेक वर्षं मालिकांमध्ये काम करत आहे. पण पहिल्यांदाच ती पौराणिक मालिकेमध्ये झळकणार आहे. पौराणिक मालिकेमधील व्यक्तिरेखेला न्याय देऊ शकेन की नाही अशी शंका असल्याने झहीदाने कधी अशाप्रकारची व्यक्तिरेखा साकारली नव्हती. पण सध्या ती मालिकेसाठी खूपच उत्सुक असल्याचे ती सांगते.