Join us  

नलू मावशीचा नो मेकअप लूक लयभारी, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल अतिसुंदर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 9:00 AM

दिप्ती केतकर साडीमध्ये सुंदर दिसतेच पण खऱ्या आयुष्यात ती तितकीच ग्लॅमरस देखील आहे. नॅचरल ब्युटीच असल्याचे चाहते दिप्तीच्या या फोटोवर कमेंट्स लाईक्स करत असल्याचे पाहायला मिळत आहे. अ

छोट्या पडद्यावरच्या ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिका प्रचंड गाजत आहे.ही मालिका अल्पावधीतच रसिकांची आवडती मालिका बनली. सुरुवातीपासून रसिकांनी मालिकेला पसंती दिली.शकू, नलू, ओम, स्वीटू, चिन्या, रॉकी आणि मालिकेतील सर्व पात्र ही प्रेक्षकांना आपलीशी आणि आपल्यातलीच एक वाटतात. इतकंच काय तर या मालिकेतील खलनायिका म्हणजेच मालविका या व्यक्तिरेखेला देखील प्रेक्षकांनी उचलून धरलं आहे.मालिकेमुळेच कलाकारांच्या लोकप्रियतेत सुद्धा दिवसागणिक वाढ होत चालली आहे.

मालिकेतल्या सगळ्याच कलाकारांच्या भूमिकांना रसिकांची पसंती मिळत आहे. यात विशेष उल्लेख करावा लागेल तो नलू मावशी म्हणजे दिप्ती केतकरचा. नलू मावशी या भूमिकेला रसिकांची विशेष पंसती मिळत आहे.ही मालिका तुम्ही पाहात असणाऱ्यांसाठी नलू मावशी म्हणजेच दिप्ती हे नाव काही नवीन नाही.

सोशल मीडियावर मालिकेतल्या तिच्या लूकमुळे अनेकदा चाहते ट्रोल करताना दिसतात.अतिशय साध्या लूकमध्ये नलू मावशी मालिकेत झळकते. पण खऱ्या आयुष्यात मात्र नलू मावशी अगदी वेगळी आहे. ग्लॅमरस राहायला तिला आवडतं. सोशल मीडियावर नजर टाकल्यास तिच्या विविध अदा पाहायला मिळतात. तिचे सौंदर्य पाहून तुम्हीही तिच्या प्रेमात पडाल. 

सोशल मीडियावर दिप्ती प्रंचड सक्रीय आहे. नुकताच तिचा नो मेकअप लूक समोर आला आहे. नो मेकअप लूकमध्येही दिप्ती फारच सुंदर दिसते. तिचा असा अंदाज पाहून तुम्हीही म्हणाल सौंदर्य असावं तर असं इतकी ती दिसायला सुंदर दिसते. समोर आलेल्या लूकमध्ये दिप्तीने साडी परिधान केलेली असून केस मोकळे सोडलेले आहेत.

दिप्ती साडीमध्ये सुंदर दिसतेच पण खऱ्या आयुष्यात ती तितकीच ग्लॅमरस देखील आहे. नॅचरल ब्युटीच असल्याचे चाहते दिप्तीच्या या फोटोवर कमेंट्स लाईक्स करत असल्याचे पाहायला मिळत आहे. अभिनयासोबतच तिच्या रिअल लाईफ लूकदेखील सर्वांची मनं जिंकत असल्याचे पाहायला मिळत आहे.

जितकी सोज्वळ नलू मावशी दिसते तितकीच ती खऱ्या आयुष्यात ग्लॅमरस दिसते. मालिकेतील तिच्या साध्या सरळ लुकप्रमाणेच तिच्या मॉडर्न लूकवर देखील चाहते पूर्णपणे फिदा झाले आहेत असं म्हंटल तर खोटं ठरणार नाही.