Join us  

१२ वर्षांची ही बालकलाकार आहे तब्बल इतक्या कोटींची मालकीण, प्रॉपर्टीचा आकडा वाचून सुटेल तुम्हाला घाम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2020 4:00 PM

छोट्या पडद्यावरील १२ वर्षांची ही बालकलाकार आता कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे

छोट्या पडद्यावरील १२ वर्षांची बालकलाकार आता कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे. ही अभिनेत्री म्हणजे स्टार प्लस वाहिनीवरील मालिका ये है मोहब्बतेंमधील छोटी क्यूट मुलगी म्हणजेच बालकलाकार रुहानिका धवन. ये है मोहब्बतें मालिका २ डिसेंबर, २०१३मध्ये प्रसारीत झाली होती. या मालिकेला अल्पावधीतच खूप लोकप्रियता मिळाली होती. या मालिकेत दिव्यांका त्रिपाठी आणि करण पटेल मुख्य भूमिकेमध्ये होते. तर रुहानिका धवनने छोटी आणि क्युट मुलीची भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे रुहानिकाला खूपच लोकप्रियता मिळाली होती. 

रुहानिका खूपच सुंदर आणि गोड असून ती खूपच शांत स्वभावाची आहे. हेच कारण आहे कि कमाईच्या बाबतीत ती मोठ मोठ्या कलाकारांना मागे टाकते. माहितीनुसार रुहानिका जवळ जवळ ६.५ कोटींची मालकीण आहे. रुहानिकाला प्रत्येक एपिसोडसाठी २५००० रुपये इतके मानधन मिळते. 

रुहानिका आपल्या शूटिंगच्या सेटवर ऑडी ए ४ मॉडेलच्या लक्झरी कारमधूनही येत असते. या कारची किंमत जवळ जवळ ५० लाख रुपये इतकी आहे. रुहानिकाने स्वतः ही कार आपल्या कमाईमधून खरेदी केली आहे. याशिवाय तिने एक ३ बीएचके फ्लॅट देखील खरेदी केला आहे. 

मालिका व जाहिरातीशिवाय रूहानिका चित्रपटातही झळकली आहे.

२०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या घायल वन्स अगेन या सनी देओलच्या चित्रपटामध्ये देखील झळकली होती.

टॅग्स :ये है मोहब्बतेंदिव्यांका त्रिपाठी