‘ये है मोहब्बतें’च्या या अभिनेत्रीने केले बोल्ड फोटोशूट, पाहा फोटो !
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:05 IST
एकता कपूर हिच्या आगामी ‘रागिनी एमएमएस रिर्टन्स’ या वेबसिरीजमध्ये बघावयास मिळणारी अभिनेत्री करिष्मा शर्मा हिने नुकतेच बोल्ड फोटोशूट केले आहे. यातील काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर अपलोड केले आहेत. सध्या करिष्माचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच पसंत केले जात आहेत.
‘ये है मोहब्बतें’च्या या अभिनेत्रीने केले बोल्ड फोटोशूट, पाहा फोटो !
एकता कपूर हिच्या आगामी ‘रागिनी एमएमएस रिर्टन्स’ या वेबसिरीजमध्ये बघावयास मिळणारी अभिनेत्री करिष्मा शर्मा हिने नुकतेच बोल्ड फोटोशूट केले आहे. यातील काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर अपलोड केले आहेत. सध्या करिष्माचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच पसंत केले जात आहेत. करिष्माने एक फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘My one hour photoshoot’ करिष्माचे हे फोटो अमित खन्ना याने शूट केले आहेत. करिष्माने ‘ये है मोहब्बतें’ या मालिकेव्यतिरिक्त ‘पवित्र रिश्ता, फियर फाइल्स : डर की सच्ची तस्वीरे, आहट आणि सिलसिला प्यार का’ या मालिकांमध्ये काम केले. त्याचबरोबर तिने ‘प्यार का पंचनामा-२’ मध्येही काम केले आहे. एका मुलाखतीत करिष्माने सांगितले होते की, मला बोल्ड सीन करण्यात काहीच वावगे वाटत नाही. उलट मी माझ्या स्क्रीन शोबद्दल स्वत:ला खूपच रिलॅक्स समजते. स्टोरी डिमांडनुसार जर टॉपलेस होण्यास सांगितले तरीदेखील मला त्यात काहीच वावगे वाटणार नसल्याचेही करिष्माने स्पष्ट केले.