Join us  

"बायको माझ्यावर थुंकली, नंतर स्वत:चं डोकं भिंतीवर आपटलं, अन्...”; अभिनेता करण मेहराचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2021 12:30 PM

बायकोला मारहाण केल्याप्रकरणी अभिनेता करण मेहराला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर सकाळी जामिनावर सोडण्यात आलं.

ठळक मुद्देइतक्या वर्षाची मेहनत, काही वर्षाच्या नात्यात हे घडलं खूप वेदनादायी आहे.आमच्यातील वाद सोडवण्यासाठी निशाचा भाऊ रोहित सेठियाही आला होता तुम्हाला जे काही कायदेशीर करायचं आहे करा मीदेखील कायद्याने उत्तर देतो

मुंबई – ‘ये रिश्ता क्या कहलाता है’(Yeh Rishta Kya Kehlata Hai) शोमधील प्रमुख अभिनेता करण मेहरा(Karan Mehra) याला सोमवारी रात्री पोलिसांनी अटक केली आहे. पत्नी निशाला मारहाण करून तिला जखमी केल्याचा करणवर आरोप आहे. या संपूर्ण प्रकरणात करण मेहराने एका हिंदी वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत खुलासा करत इतक्या वर्षाच्या लग्नाच्या नात्यात जे घडलं ते वेदनादायी आहे असं सांगत पत्नी निशावर गंभीर आरोप लावले आहेत.

करण मेहरा म्हणाला की, इतक्या वर्षाची मेहनत, काही वर्षाच्या नात्यात हे घडलं खूप वेदनादायी आहे. मागील एक महिन्यापासून आमच्यात वाद सुरू होता. कारण अनेक दिवसांपासून आमच्या दोघांच्या नात्यात काहीही ठीक चाललं नव्हतं. तेव्हा आम्ही विचार केला दोघांनीही वेगळं व्हायचं अथवा काही तरी करायचं. त्यासाठी आम्ही आमच्यातील काही गोष्टी ठीक करण्याचा प्रयत्न करत होतो. आमच्यातील वाद सोडवण्यासाठी निशाचा भाऊ रोहित सेठियाही आला होता असं त्याने सांगितले.

त्यानंतर निशा आणि तिच्या भावाने घटस्फोटासाठी जी रक्कम मागितली तेवढी रक्कम देणं शक्य नव्हतं. इतके पैसे मला देता येणार नाही त्यावरून आमच्यात वाद सुरू होता. रात्री १० वाजता ते दोघंही माझ्या जवळ आले. तेव्हाही ते याच विषयावर बोलत होते. मी स्पष्टपणे सांगितले इतकी रक्कम देऊ शकत नाही. तुम्हाला जे काही कायदेशीर करायचं आहे करा मीदेखील कायद्याने उत्तर देतो असं करण मेहराने सांगितले.

यानंतर मी माझ्या रुममध्ये गेलो, माझ्या आईशी बोलत होता. तेव्हा निशा आतमध्ये आली तिने माझ्या आई-वडिलांना, भावाला शिवीगाळ करणं सुरू केले. जोरजोरात ओरडायला लागली आणि माझ्या अंगावर थुंकली. तेव्हा मी निशाला बाहेर जायला सांगितले त्यानंतर आता बघ मी काय करते अशी धमकी देऊन बाहेर गेली. सुरुवातीला निशाने स्वत:चं डोकं भिंतीवर आपटलं. सर्वांना हे सांगितलं करणने मारहाण केलीय. निशाच्या भावाने मला मारहाण केली. माझ्या गालावर आणि छातीवर मारहाणर केली. मी मारहाण केली नाही हवंतर घरातील कॅमेरे पाहू शकता पण कॅमेरे आधीच बंद केल्याचं आढळलं असं करणने सांगितले.

दरम्यान, निशाच्या भावाने व्हिडीओ रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांना बोलावलं. खरं काय ते पोलिसांना माहिती आहे. खोटा गुन्हा दाखल केला तरी सत्य बाहेर येईल. पोलिसांचा तपास होईल तेव्हा सगळं उघड होईल. कितीही रक्कम मागितली तर मी आणणार कुठून? सगळं काही ठीक होणार होतं. परंतु निशा मला सोडून गेली. ती मला माझ्या मुलापासूनही दूर करण्याचा प्रयत्न करत असल्याची जाणीव होत होती. मी पोलीस स्टेशनला रात्री होतो. त्यानंतर मित्रांच्या घरी गेलो. निशाला जे हवं होतं ते झालं नाही असं करण मेहरा म्हणाला.

टॅग्स :पोलिस