Join us

​दिल है हिंदुस्तानीच्या सेटवर शेखर रावजियानीच्या डोळ्यात का आले पाणी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2017 17:47 IST

दिल है हिंदुस्तानी या कार्यक्रमाची घोषणा झाल्यापासूनच रसिकांना या कार्यक्रमाची उत्सुकता लागलेली आहे. या कार्यक्रमात करण जोहर, बादशहा आणि ...

दिल है हिंदुस्तानी या कार्यक्रमाची घोषणा झाल्यापासूनच रसिकांना या कार्यक्रमाची उत्सुकता लागलेली आहे. या कार्यक्रमात करण जोहर, बादशहा आणि शेखर परीक्षकाची भूमिका बजावत आहेत. या कार्यक्रमाच्या ऑडिशनला अनेकांनी हजेरी लावली होती. सगळ्याच स्पर्धकांचे आवाज इतके सुंदर होते की, कोणाला निवडायचे असा प्रश्न सगळ्या परीक्षकांना पडला होता. सध्या या कार्यक्रमातील स्पर्धक एकापेक्षा एक चांगली गाणी सादर करत आहेत. अनेकांचे आवाज हे मनाला स्पर्शून जाणारे आहेत. या कार्यक्रमाच्या मंचावर नुकताच एका राजस्थानी लोकगीताच्या पथकाने गाणे सादर केले. त्यांचे गाणे इतके सुंदर होते की, हे गाणे ऐकून शेखरच्या डोळ्यांत पाणी आले. दिल है हिंदुस्तानी या कार्यक्रमात केवळ वैयक्तिकच नव्हे तर सामूहिक पद्धतीनेही गाणे सादर करता येतात. राजस्थानमधील फकिरा नावाच्या एका लोकगीताच्या पथकाने भारदार आवाजात एक गाणे सादर केले. या गाण्याने उपस्थितांची वाहवा मिळवली. हे गाणे त्यांनी त्यांच्या पारंपरिक वाद्यांसोबत सादर केले. हे गाणे ऐकून सगळेच परीक्षक खूप खूश झाले होते. पण शेखर रावजियानी या गाण्यामुळे चांगलाच प्रभावित झाला. हे गाणे ऐकताना नकळत त्याच्या डोळ्यात पाणी आले. हे गाणे संपताच तो मंचावर गेला आणि त्याने सगळ्या कलाकारांना मिठी मारली. शेखर या गाण्याविषयी सांगतो, "या गायकांनी सादर केलेले लोकगीत हे अफलातून होते. त्यांचे हे गाणे ऐकून मी काही काळ थक्कच झालो होतो. पारंपरिक वाद्याचा वापर त्यांनी खूपच चांगल्याप्रकारे केला होता."