Join us

​का रडतोय कुलस्वामिनी फेम संग्राम साळवी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2017 16:32 IST

संग्राम साळवी सध्या कुलस्वामिनी या मालिकेत एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. त्याची ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच आवडत आहे. कुलस्वामिनी ...

संग्राम साळवी सध्या कुलस्वामिनी या मालिकेत एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. त्याची ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच आवडत आहे. कुलस्वामिनी ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले असले तरी ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरू लागली आहे. रेणुका मातेची महती सांगताना आस्तिक नास्तिकतेचा संघर्ष या मालिकेतून दाखवला जात आहे. या मालिकेत संग्राम साळवी राजस देवधर ही भूमिका साकारतो आहे. राजसच्या व्यक्तिरेखेला अनेक पैलू आहे. लहानपणीच त्याची आई गेली असून त्याचे वडिलांशी कधी पटलेच नाही आणि वडिलांनी त्याला कधी समजूनही घेतले नाही. त्यामुळे वडिलांच्या मनाविरूद्ध तो नेहमी वागतो. मात्र, त्याच्या मनात मायेचा ओलावाही आहे. संग्रामला 'राजस बोलला, विषय संपला' असा खणखणीत संवाद मिळाल्यामुळे या व्यक्तिरेखेला अजून आयाम मिळाले आहेत. हा संवाद सध्या चांगलाच गाजत आहे. संग्रामची भूमिका प्रेक्षकांना आवडत असल्याने त्याला आनंद व्हायला पाहिजे होता. पण असे न होता तो सध्या रडत असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. संग्रामनेच त्याच्या इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साइटवर एक फोटो पोस्ट केला आहे आणि या फोटोत तो आपल्याला रडताना दिसत आहे. त्याचे रडण्याचे कारण हे खूप वेगळे आहे. या फोटोत एक व्यक्ती त्याचे केस कापताना दिसत आहे. त्याचे केस कापले जात असल्यामुळेच तो रडत आहे. केस कापायला लहान मुलांना आवडत नाही. त्यामुळे केस कापताना ते रडत असल्याचे आपल्याला अनेक वेळा पाहायला मिळते. पण आता संग्राम देखील लहान मुलाप्रमाणे केस कापताना आपल्याला रडताना दिसत आहे. संग्रामने इन्स्टाग्रामला पोस्ट केलेल्या या फोटोवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यांना संग्रामचा हा नवा लूक आवडत असल्याचे ते आवर्जून सांगत आहेत. एवढेच नव्हे तर संग्रामच्या या फोटोवर त्याची होणारी पत्नी अभिनेत्री खुशबू तावडेने देखील प्रतिक्रिया दिली आहे. तिने कमेंटमध्ये एक फ्लाइंग किसची स्मायली पोस्ट करत तिला हा त्याचा नवा लूक आवडला असल्याचे सांगितले आहे.Also Read : कम्फर्ट सोडून आव्हानात्मक भूमिका भावतात - संग्राम साळवी