Join us  

विजयनगर वर कोण राज्‍य करणार? कृष्‍णदेवराय आणि पंचवृषमध्‍ये निर्णायक लढाई

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 6:09 PM

रामाच्‍या (कृष्‍ण भारद्वाज) अवघड समस्‍यांचे निराकरण करण्‍याच्‍या बुद्धी व क्षमतेला तसेच राजा कृष्‍णदेवराय (मानव गोहिल) आणि त्‍याच्‍या साम्राज्‍याला वाचवण्‍याचे आव्‍हान देण्‍यात येणार आहे.

'तेनाली रामा' मालिकेने ५०० एपिसोड्स पूर्ण  करत रसिकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेमध्‍ये आता काही रंजक ट्विस्‍ट्स पाहायला मिळणार आहेत. रामाच्‍या (कृष्‍ण भारद्वाज) अवघड समस्‍यांचे निराकरण करण्‍याच्‍या बुद्धी व क्षमतेला तसेच राजा कृष्‍णदेवराय (मानव गोहिल) आणि त्‍याच्‍या साम्राज्‍याला वाचवण्‍याचे आव्‍हान देण्‍यात येणार आहे. 

विजयनगरमध्‍ये एक संशयास्‍पद मुलगा सोमू (हृद्यांश शेखावत) आल्‍यानंतर साम्राज्‍याला क्रोधाचा (राग) दुष्‍ट शाप लागला आहे. राजाचा शांत स्‍वभाव भंग करण्‍याच्‍या प्रयत्‍नांमध्‍ये सोमू अखेर राजाला साहसी योद्धा पंचवृषसह द्वंद युद्ध करण्‍याचे आव्‍हान स्‍वीकारण्‍यास भाग पाडतो. राजाला आव्‍हान दिलेल्‍या या भव्‍य योद्धाच्‍या प्रवेशासह विजयनगरचे भविष्‍य आता धोक्‍यात आहे. कृष्‍णदेवराय युद्धात हरला तर पंचवृष साम्राज्‍यावर राज्‍य करेल. राजाला त्‍याच्‍या रागीट स्‍वभावाचा सामना करावा लागत आहे. राजा रागाच्‍या भरात तथाचार्यला (पंकज बेरी)  फाशीवर लटकवण्‍याची शिक्षा देतो. 

तेनाली रामाची भूमिका साकारणारा कृष्‍ण भारद्वाज म्‍हणाला, ''कृष्‍णदेवरायची राजा म्‍हणून प्रतिष्‍ठा आणि विजयनगरचे भविष्‍य धोक्‍यात आहे. तेनाली क्रोधाने निर्माण केलेल्‍या या गंभीर समस्‍यांवर मात करण्‍यासाठी योजना आखण्‍याचा प्रयत्‍न करत आहे. ही एक मनोरंजक कथा आहे, ज्‍यामध्‍ये आपण कधी-कधी रागाच्‍या भरात केलेल्‍या कृती आणि त्‍याच्‍या परिणामांना दाखवण्‍यात आले आहे. आम्‍ही या एपिसोड्सच्‍या शूटिंगचा खूप आनंद घेतला. आमचे प्रेक्षक आगामी एपिसोड्सचा आनंद घेतील आणि मी त्‍यांची प्रतिक्रिया पाहण्‍यास खूपच उत्‍सुक आहे.'' 

कृष्‍णदेवरायची भूमिका साकारणारा मानव गोहिल म्‍हणाला, ''६ वाईट गुणांपैकी एक असलेल्‍या क्रोधाने (राग) मालिकेमध्‍ये प्रवेश केला आहे. मी मालिकेची संकल्‍पना व पटकथेचा आनंद घेत आहे. ही कथा लोकांना सकारात्‍मक संदेश देण्‍याबरोबरच आपल्‍या जीवनांमधील या दुष्‍ट कृत्‍यांच्‍या परिणामांची जाणीव करून देते. कथेमधील एका रोमांचपूर्ण ट्विस्‍टमध्‍ये कृष्‍णदेवरायच्‍या राजा म्‍हणून प्रतिष्‍ठेला आव्‍हान करण्‍यात आले आहे. मला खात्री आहे की, आमचे प्रेक्षक आगामी एपिसोड्सचा भरपूर आनंद घेतील.''  

टॅग्स :तेनाली रामा