उर्मिलाला चोरुन कोण पाहतय...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2016 01:03 IST
सेलिब्रिटीजची लाईफ अशी असते कि जिथे जाईल तिथे त्यांना कॅमेरा असो कि फॅन्स सगळ््यांच्या नजरांना ...
उर्मिलाला चोरुन कोण पाहतय...
सेलिब्रिटीजची लाईफ अशी असते कि जिथे जाईल तिथे त्यांना कॅमेरा असो कि फॅन्स सगळ््यांच्या नजरांना सामोरे जावे लागते. काही फॅन्स तर असे असतात कि आपल्या आवडत्या कलाकाराची एक झलक पाहण्यासाठी त्यांचा पाठलाग करतात अन लपुन -चोरुन सुद्धा सेलिब्रिटीजना पाहतात. आता उर्मिला कोठारे हिच्यासोबत पण असेच काही झाले आहे. उर्मिला म्हणतीये मला पाठीमागुन कोण बर चोरुन पाहतय. त्याच झाल असे कि, उर्मिला सेल्फी काढत होती अन तिला अचानक जाणवल की आपल्याला कोणीतरी पाठीमागुन चेक करीत आहे. आता उर्मिलाला असे कोण पाहत होते याची उत्सुकता लागली असेल तर थांबा तीला कोणी फॅन नाही तर चक्क कांगारु चोरुन पाहत होते. हे आम्ही नाही तर उर्मिला स्वत:च सांगत आहे. हुज दॅट चेकिंग मी आऊट फ्रॉम बॅक.. ऊप्स इट्स कांगारु असे तीने सांगितले आहे. आता उर्मिला जरा जपुनच सेल्फी काढत जा असे तिचे फॅन्स तिला नक्कीच सांगतील.