Join us

सोफीच्या आयुष्यातील हा कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2016 12:57 IST

सोफी चौधरी लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. सोफीने नुकताच ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईटवर एक फोटो पोस्ट केला ...

सोफी चौधरी लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. सोफीने नुकताच ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईटवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये तिच्यासोबत एक व्यक्ती दिसत आहे. या फोटोसोबत सोफीने आता मी वाट पाहू शकत नाही असे कॅप्शन दिले आहे. या तिच्या पोस्टवर तिच्या मैत्रिणी बिपाशा बासू, अमृता अरोरा आणि नेहा धुपिया यांनी तिचे अभिनंदन केले आहे. यावरून सोफी लवकरच लग्न करणार असल्याचे कळत आहे. पण सोफी कोणाशी लग्न करतेय हे कळण्यासाठी काही दिवस तरी नक्कीच वाट पाहावी लागणार आहे.