Join us

रितेश देशमुखच्या कोणत्या कौशल्य शैलीने स्पर्धकांना केले बोलते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2016 15:44 IST

व्यवहारकौशल्य आणि चातुर्य या दोन गोष्टींवर अवलंबून असणारा 'विकता का उत्तर' हा शो प्रेक्षकांना तासभर टीव्हीसमोर खिळवून ठेवण्यास यशस्वी ...

व्यवहारकौशल्य आणि चातुर्य या दोन गोष्टींवर अवलंबून असणारा 'विकता का उत्तर' हा शो प्रेक्षकांना तासभर टीव्हीसमोर खिळवून ठेवण्यास यशस्वी ठरतोय. सामान्य माणसांना सेलिब्रिटी बनवणारा हा गेम शो रसिकांचे केवळ मनोरंजनच करत नाही, तर प्रेक्षकांच्या भावविश्वासोबत तो आपले नाते जोडत आहे. 'विकता का उत्तर' च्या या यंदाच्या भागात असेच काही वेगळे हटके हॅपनिंग रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. येणा-या भागात प्रेक्षक एकाबाजूला भरपूर हसतील तर दुसरीकडे तितकेच भावूक देखील होतील. आपल्या कवितांचे पुस्तक प्रकाशित करण्याचे स्वप्न उराशी बाळगून स्पर्धेत उतरलेली युवा स्पर्धक गौरी बोगटे हिचे व्यक्तिमत्व प्रेक्षकांना आपलेसे करणारे ठरेल. तसेच आपल्या मर्जीने मुक्त आयुष्य जगू इच्छिणारे कोल्हापूरचे ख्रिस्तोफर लोखंडे आणि नाशिक येथे बुलेट सर्विस सेंटर चालवणा-या दीपिका दुसाने  यांचे वेगळे व्यक्तिमत्वदेखील यंदाच्या भागाचे प्रमुख आकर्षण असणार आहे. यंदाच्या भागात आलेल्या या तीन स्पर्धकांसोबत रितेश देशमुखने स्पर्धकांना आपल्या दिलखुलास संवाद शैलीने  ज्या खुबीने बोलते केले आहे ते पाहण्यासारखे आहे.डान्स,मस्ती, विनोद आणि तेवढेच इमोशनल टच असणारे यंदाचे हे तीन भाग प्रेक्षकांना नक्कीच आपलेसे करणारे ठरणार आहेत. थोडक्यात सांगायचे तर, मनोरंजनाबरोबरच मानवी भाव-भावनेचा बॅलेंस साधणारे या आठवड्यातले  तीन एपिसोड प्रेक्षक नक्कीच पसंत करतील, यात शंका नाही.