Join us  

गोविंदाला ओळखले नव्हते या महान गायकाने, हा किस्सा वाचून तुम्हाला आवरणार नाही हसू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 6:30 AM

या गायकानेच हा किस्सा द कपिल शर्मा शो मध्ये सांगितला आहे.

ठळक मुद्देपूरणचंद यांनी सांगितले की,“लखविंदरने मला सांगितले की अभिनेता गोविंदाला मला भेटायचे आहे. आम्ही त्यांच्या घरी गेलो तेव्हा एका व्यक्तीने माझ्या पायाला स्पर्श करून आमचे स्वागत केले. तीच व्यक्ती गोविंदा असल्याचे मला माहीतच नव्हते.

द कपिल शर्मा मध्ये या आठवड्यात वडाली कुटुंबातील नामांकित सूफी गायक हजेरी लावणार आहेत. वडाली बंधूमधील सर्वात मोठे पूरणचंद वडाली आणि त्यांचा मुलगा लखविंदर वडाली सेटवर उपस्थित राहणार आहेत. सुफी संतांचे संदेश गाण्याची परंपरा असलेल्या संगीतकारांच्या पाचव्या पिढीमध्ये जन्मलेल्या वडाली बंधूंनी सुफी गायक होण्यापूर्वी एका वेगळ्या गोष्टीत हात आजमावला होता. पूरणचंद वडाली या क्षेत्रात येण्याआधी 25 वर्ष आखाड्यात नियमितपणे कुस्ती खेळत होते. ते आपल्या आयुष्यातील मनोरंजक किस्से या कार्यक्रमात सांगणार आहेत.

 पूरणचंद यांना पद्मश्री मिळणार याची घोषणा झाल्यानंतर सुरुवातीला त्यांनी हा पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला होता याविषयी कपिलने विचारले असता त्यांनी सांगितले, “जेव्हा पद्मश्री पुरस्काराचे सत्कार पत्र माझ्या घरी आले तेव्हा मला पद्मश्री म्हणजे काय याची काहीच कल्पना नव्हती. हे पत्र एक वर्षभर पडून होते. पुढच्याच वर्षी मला पुन्हा तेच पत्र मिळाले, तेव्हा लोकांनी मला पुरस्कारासाठी जाण्याचा आग्रह केला. पण मी त्यांना म्हणालो, “देना है तो दोनो भाईयो को दो, मै अकेले नहीं लुगा (जर तुम्हाला आमचा सत्कार करायचा असेल तर दोन्ही वडाली बंधूंचा सत्कार करा, माझा एकट्याचाच नव्हे).”

 त्यानंतर त्यांनी आणखी काही मनोरंजक किस्से सांगितले. ते एकदा अभिनेता गोविंदाकडे जेवणासाठी गेले होते. पण त्यांनी त्याला ओळखलेच नाही. याविषयी त्यांचा मुलगा लखविंदरने सांगितले की, “एकदा आम्हाला गोविंदा यांनी घरी जेवायला बोलावले होते. आम्ही घरी पोहचल्यानंतर पापाजी त्यांच्याशी बराच वेळ बोलले. 30 मिनिटे त्यांच्यासोबत वेळ घालवल्यानंतर त्यांनी मला विचारले की, “गोविंदाजी कहां है, जिन्होने हमें बुलाया?” मुलांचे हे बोलणे ऐकल्यानंतर पूरणचंद यांनी सांगितले की,“लखविंदरने मला सांगितले की अभिनेता गोविंदाला मला भेटायचे आहे आणि म्हणूनच त्यांनी त्यांच्या घरी जेवणाचा समारंभ आयोजित केला आहे. आम्ही त्यांच्या घरी गेलो तेव्हा एका व्यक्तीने माझ्या पायाला स्पर्श करून आमचे स्वागत केले. तीच व्यक्ती गोविंदा असल्याचे मला माहीतच नव्हते. मला ते कळल्यानंतर त्याच्यासमोर मी कबूल देखील केले की, तुझ्या आईला म्हणजेच निर्मला देवींना मी चांगल्या प्रकारे ओळखतो. पण मी सिनेमा पाहत नसल्याने मी तुला ओळखले नाही.”

 

टॅग्स :गोविंदा