Join us  

अभिनेत्रीला उत्तम शिक्षण देता यावे म्हणून तिच्या आईने शिकल्या तीन भाषा, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2021 12:44 PM

आपल्या आईकडून आपण ज्या गोष्टी शिकल्या, त्याबद्दल अंजुम फकीह म्हणाली, “गेल्या काही वर्षांत मी माझ्या आईच्या खूपच जवळ आले आहे. ती माझी सर्वोत्कृष्ट मैत्रीण बनली असून ती माझी सर्वात विश्वासू व्यक्ती बनली आहे.

आपल्या दर्जेदार अभिनयाने अनेक टीव्ही मालिकांमध्ये अंजुम फहिमने भूमिका साकारल्या असल्या, तरी ‘झी टीव्ही’वरील ‘कुंडली भाग्य’मधील भूमिकेने तिला जबरदस्त ओळख दिली.या मालिकेतील सृष्टीच्या भूमिकेने तिने सर्व प्रेक्षकांवर मोहिनी टाकली असली. अभिनयक्षेत्रात करिअर घडवणे अभिनेत्रीसाठी सोपं नव्हतं. अभिनयात करिअर करण्यासाठी  तिच्या कुटुंबियांचा विरोध होता. सुरुवातीला तिचे कुटुंबीय आणि अन्य नातेवाईक तिच्या या निर्णयाशी सहमत नव्हते. पण आता त्यांना तिचा खूप अभिमान वाटतो. या सर्व अनुभवातून अंजुमने जीवनविषयक महत्त्वाचे धडे शिकले. या अवघड काळात तिच्या आईने तिला मार्गदर्शन केले. आपल्या जीवनात आपल्या आईचे स्थान किती महत्त्वाचे आहे, हे मातृदिनानिमित्त अंजुमने सांगितले. अंजुमला उत्तम शिक्षण मिळावे, यासाठी अंजुमच्या आईने तीन भाषा शिकल्या आहेत.

आपल्या आईकडून आपण ज्या गोष्टी शिकल्या, त्याबद्दल अंजुम फकीह म्हणाली, “गेल्या काही वर्षांत मी माझ्या आईच्या खूपच जवळ आले आहे. ती माझी सर्वोत्कृष्ट मैत्रीण बनली असून ती माझी सर्वात विश्वासू व्यक्ती बनली आहे. खरं तर मी तिला सर्व काही सांगते. मला काहीही हवं असलं, की मी तिच्याचकडे जाते. तिच्याकडून मला जीवनविषयक मिळालेली सर्वात मोठी शिकवण म्हणजे कधीही खोटं बोलू नकोस, हे तिने मला सांगितलं. ही गोष्ट माझ्या मनावर अगदी कोरली गेली असून ती माझ्या व्यक्तिमत्त्वाचा भागच बनली आहे. नेहमी सत्याच्या बाजूने राहा, हे मला आणि माझ्या भावंडांना माझ्या आईने नेहमीच शिकविलं होतं. नेहमी खरं बोलण्याची आणि सत्याच्या बाजूने उभं राहण्याची शिकवण तिने आम्हाला दिली आणि ती आजपर्यंत आमच्यात कायम आहे. '

आपल्या आईने आपल्यासाठी किती विशेष कष्ट घेतले, ते सांगताना अंजुम म्हणाली, “तिची आणखी एक गोष्ट माझ्या लक्षात आहे आणि ती म्हणजे, आम्हाला उत्तम शिक्षण मिळावं, यासाठी तिने केलेले प्रयत्न. तिने जरी उर्दू माध्यमातून शिक्षण घेतलेलं असलं, तरी तिने इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषा शिकल्या होत्या. आम्हाला तिला शिकविता यावं यासाठीच तिने या भाषा शिकल्या होत्या. 

आम्हाला उत्तम शिक्षण मिळावं आणि आम्ही स्वतंत्रपणे आमच्या पायांवर उभे राहावं, यासाठी तिने हे केलं.  तिने आमच्यासाठी आजवर जे काही केलं आणि आजही नि:स्वार्थीपणे ती आमच्यासाठी जे करीत असते, त्याबद्दल येत्या मातृदिनी मी तिचे आभार मानणार आहे. तिने आम्हाला जी मूल्यं शिकविली, त्यामुळेच आज आम्ही असे घडलो. तिच्या प्रेमामुळे आणि प्रयत्नांमुळे आम्ही आज खंबीरपणे उभे आहोत. आमच्यावर विश्वास टाकल्याबद्दल आणि आम्हाला आधार दिल्याबद्दल मी माझ्या आईची ऋणी आहे.”

टॅग्स :मदर्स डे