Join us

जेव्हा अमृता खानविलकरला एक चिमुकला I Love You म्हणतो? जाणून घ्या त्यावेळी काय घडले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2017 13:12 IST

'2 MAD'च्या मंचावर अमृताचा खानविलकरच्या  एका चिमुलकल्या फॅनने अमृताला एक अनोखी डिमांड केली आहे. या मंचावर अनेक चिमुकले मुल ...

'2 MAD'च्या मंचावर अमृताचा खानविलकरच्या  एका चिमुलकल्या फॅनने अमृताला एक अनोखी डिमांड केली आहे. या मंचावर अनेक चिमुकले मुल मुली आले. आपल्या हटके डांस स्टाइलने तर कधी आपल्या दिलखेचक अदांनी  तर काहींना चक्क आपल्या मनातील इच्छा बोलून जजेसची मनं जिकली. पुण्यातला श्री दळवी १२ वर्षाच्या मुलाने अमृताला प्रोपोज केलं.श्री दळवीतील निरागसता आणि नृत्य याच्या प्रेमात परीक्षक पडले. डांस ऑडीशन दरम्यान त्याने संपूर्ण डांस अमृताकडे बघून केला आणि जेंव्हा उमेश जाधव यांनी त्याला विचारले कि, तू अस का केले तेंव्हा त्याने अतिशय निरागस रीत्या अमृताला प्रोपोज केले तो म्हणाला “तू मला लय आवडते” आणि त्यावर अमृता देखील I Love you too म्हणाली आणि त्याच्या बरोबर डांस देखील केला.उमेश जाधव यांनी त्याला आपल्या अंदाजात कमेंटही दिल्या.याच मंचावर मुंबईमधील तुषार खेराडे हा स्टेजवर येताच अमृताकडे बघून म्हणाला तुम्हाला बघायचं होत म्हणून खास करून ऑडिशन देण्यासाठी आलो असल्याचे सांगितले.आपण ज्या व्यक्तीला आपला आयडल  मानतो तिला भेटल्यावर अथवा तिच्यासमोर डांस करण्याची संधी मिळाल्यावर भारावून जाणे हे सहाजिक आहे,तसच काहीस तुषारच देखील झालं होतं.असे भन्नाट आणि मजेशीर किस्से रसिकांचे खूप मनोरंजन करतील यांत शंका नाही.2 MAD – महाराष्ट्राचा अस्सल डान्सर  च्या सेटवर महाराष्ट्रात असलेले भन्नाट टॅलेंट प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या नृत्य पद्धती थक्क करणाऱ्या आहेत. इथे आलेल्या मुला – मुलींचा डांस बघून या कार्यक्रमाचे परीक्षक अमृता खानविलकर, संजय जाधव आणि उमेश जाधव देखील थक्क होतात.  एका पेक्षा एक अप्रतिम नृत्य सादर करून ते महाराष्ट्राला आपल्यातला MADness दाखवून वेड लावायला सज्ज आहेत हे मात्र नक्की.