Join us

'कृष्णा चली लंडन'साठी गौरवने वाढवले वजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2018 13:15 IST

आपल्या मालिकेच्या दृश्यांमध्ये सुयोग्य दिसण्यासाठी आता टेलिव्हिजन कलाकारसुद्धा मोठी मेहनत घेतात. काही कलाकार तर मालिकेची गरज म्हणून वजनही वाढवतात. ...

आपल्या मालिकेच्या दृश्यांमध्ये सुयोग्य दिसण्यासाठी आता टेलिव्हिजन कलाकारसुद्धा मोठी मेहनत घेतात. काही कलाकार तर मालिकेची गरज म्हणून वजनही वाढवतात. असाच एक तरूण अभिनेता आहे गौरव सरीन.गौरव स्टारप्लसवरील कृष्णा चली लंडनमध्ये राधेची व्यक्तिरेखा साकारत आहे. त्याला एका खास दृश्यासाठी गौरव सरीनला वजन वाढवायला सांगण्यात आले. तो म्हणतो, “शोमध्ये एक स्वप्नातले दृश्य आहे ज्यात राधे हेल्दी दिसायला हवा होता. राधेला स्वप्न पडते की त्याचे आणि कृष्णाचे लग्न झाले आहे आणि आता ते मध्यम वयात असून एकमेकांसोबत खूप खुश आहेत. मी दिग्दर्शकांसोबत ह्या दृश्याबद्दल चर्चा केली आणि मग आम्ही अनेक लूक टेस्ट्‌स केल्या. मला ऑनस्क्रीन राधे साकारायला खूप आवडत आहे आणि माझ्या व्यक्तिरेखेला न्याय देण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे.” ह्या शोमध्ये राधे हा एक गोड मुलगा आहे ज्याचे कृष्णासोबत लग्न होणार आहे, पण त्याचे तिच्यासोबत आंबटगोड असे नाते आहे. आपली स्वप्ने कधी पूर्ण होणार नाहीत ह्या भीतीमुळे कृष्णा राधेसोबत लग्न करण्यास नकार देते आणि त्याचे मन वळवते की त्याने त्याच्या घरच्यांसोबत बोलावे आणि तिला ह्या सगळ्‌या प्रकारात मदत करावी. पण राधे मात्र आपल्या ह्या होणाऱ्या बायकोला प्रभावित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो. प्रश्न हा आहे की लग्नानंतर काय होणार ते कृष्णाला ठाऊक आहे का?‘कृष्णा चली लंडन’ या मालिकेत राधे या 21 वर्षीय तरुमाची मध्यवर्ती भूमिका रंगविणाऱ्या गौरव सरीनला उत्तर प्रदेशात वाढलेल्या या राधेची भूमिका साकारण्यासाठी बरीच मेहनत करावी लागली. राधेच्या भूमिकेला न्याय देण्यासाठी आणि त्यासाठी प्रेरणा घेण्यासाठी गौरवने अभिनेता गोविंदाचे अनेक चित्रपट पाहिले.