Join us

रिश्ता लिखेंगे हम नया या मालिकेमुळे रोहित सुचंतीची ही भीती झाली दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2017 11:40 IST

रिश्ता लिखेंगे हम नया मालिकेतील थाट-माट आणि भव्यता यामुळे ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या मालिकेत रतनची भूमिका ...

रिश्ता लिखेंगे हम नया मालिकेतील थाट-माट आणि भव्यता यामुळे ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या मालिकेत रतनची भूमिका रोहित सुचंती साकारत असून दियाच्या भूमिकेत आपल्याला तेजस्वी प्रकाशला पाहायला मिळणार आहे. या दोघांच्याही अभिनयाचे सध्या चांगलेच कौतुक होत आहे. या मालिकेत तेजस्वी प्रकाश एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळत असल्याने तिचे फॅन्स खूप खूश आहेत. या मालिकेसाठी तिने नुकतेच काही स्टंट केले असून प्रेक्षकांना तेजस्वीचे हे रूप चांगले भावले आहे. तेजस्वीप्रमाणेच आता मालिकेत रोहित सुचंती देखील धाडसी स्टंट करताना प्रेक्षकांना दिसत आहे. त्यामुळे ही मालिका सध्याच्या मालिकांपेक्षा वेगळी असून प्रेक्षकांनी ती डोक्यावर घेतली आहे. या मालिकेच्या चित्रीकरणाच्या वेळी रोहितला विविध प्रयोग करायला मिळत आहे. त्यामुळे तो प्रचंड आनंदित आहे. रोहितला घोड्यांची प्रचंड भीती वाटते. पण चित्रीकरणादरम्यान तो नुकताच घोड्यावर बसला होता. याविषयी तो सांगतो, “मी आजवर कधीच घोड्यावर बसलो नव्हतो पण साखरपुड्याच्या दृश्यासाठी मी घोड्यावर बसणे गरजेचे होते. सुरुवातीला मी खूप घाबरलो होतो आणि हे दृश्य मी करू शकेन की नाही याबद्दल साशंक होतो. पण सेटवरील क्रू आणि कलाकार मंडळी यांनी मला प्रोत्साहन दिले. त्यामुळे मी घोड्यावर चढलो आणि ते दृश्य पूर्ण करू शकलो. आणखी एक दृश्याचे चित्रीकरण करताना मी प्रचंड घाबरलो होतो. माझ्या कपड्यांना आग लागते असे ते दृश्य होते, जे स्टंटमॅन करणार असे आधी ठरले होते. पण घोडेस्वारीचे दृश्य केल्यानंतर मला हे आगीचे दृश्य देखील स्वतःच करण्याची प्रेरणा मिळाली आणि स्टंट निष्णातांच्या साहाय्याने मी ते दृश्य एका टेकमध्ये पूर्ण केले.”सध्या रिश्ता लिखेंगे हम नया या मालिकेत अभय कुमारची दियाच्या आयुष्यात एंट्री झाली आहे आणि त्यामुळे अतिशय गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण झाली आहे. दियाला आता रतनची जबाबदारी आणि अभय यांच्यात निवड करायची आहे. रतनवरील हल्ले अजूनही थांबलेले नाहीत. त्यामुळे ही कारस्थाने कोण रचतंय याचा छडा लावण्याचा दियाने चंग बांधला आहे.Also Read : ​सुयश रायचे रिश्ता लिखेंगे हम नया या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर पुनरागमन