Join us  

हे काय? पळता पळता सुटली सईची नऊवारी, ‘माझा होशील ना’च्या सेटवरचा धम्माल व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 12:21 PM

जीन्सवर नऊवारी नेसली अन् फजिती झाली...; मालिकेच्या सेटवरचा हा धम्माल व्हिडीओ पाहून चाहत्यांना हसू आवरत नाहीये.

ठळक मुद्दे‘माझा होशील ना’ ही मालिका सध्या टीआरपी लिस्टमध्ये अव्वल स्थानी आहे. मालिका एका रोचक वळणावर पोहोचली आहे.

सध्या झी मराठी वाहिनीवरील  ‘माझा होशील ना’ ही मालिका सध्या तुफान गाजतेय. गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे ती या मालिकेतील सई आणि आदित्यच्या लग्नाची. लवकरच ही जोडी मालिकेत लग्नबंधनात अडकणार आहे. या लग्नाची उत्सुकता चाहत्यांना आहेच. पण त्याआधी या मालिकेच्या सेटवरचा एक धम्माल व्हिडीओ पाहून चाहत्यांना हसू आवरत नाहीये.होय, खुद्द आदित्यने म्हणजे, आदित्यची भूमिका साकारणा-या विराजस कुलकर्णीने हा Behind the scenes व्हिडीओ शेअर केला आहे. तर झाले काय की, सई म्हणजेच गौतमी देशपांडे व आदित्य पळून जात असतानाचा सीन शूट होत होता. सीनमध्ये आदित्य व सई पळत सुटतात आणि सुयशचे लोक त्या दोघांचा पाठलाग करतात...

सीन तसा गंभीर. पण अचानक पळता पळता सईची नऊवारी सुटते आणि सेटवर खसखस पिकते. आदित्य तर सईची नऊवारी सुटलेली पाहून खो-खो हसत सुटतो. सई बिचारी साडी सावरता सावरता पळण्याचा प्रयत्न करताना दिसते. एका क्षणाला तिलाही हसू आवरत नाही.

 ‘जीन्सवर नऊवारी साडी नेसून फक्त मालिकेमध्ये पळून जाता येतं. ख-या आयुष्यात ती अशी सुटली तर शॉट कट करता येत नाही. सावधान...’ या मजेदार कॅप्शनसह विराजसने हा मजेदार व्हिडीओ शेअर केला आहे.  हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावरच्या नेटक-यांनी दिलेल्या प्रतिक्रियांबद्दल तर विचारायलाच नको.‘माझा होशील ना’ ही मालिका सध्या टीआरपी लिस्टमध्ये अव्वल स्थानी आहे. मालिका एका रोचक वळणावर पोहोचली आहे. त्यानुसार, सई आणि आदित्य पळून जाण्याची योजना आखतात.  व्हॅलेन्टाईन डेच्या मुहूर्तावर सई व आदित्यचा लग्नसोहळा रंगणार आहे. 

टॅग्स :गौतमी देशपांडे