Join us  

'खूब लडी मर्दानी झांसी की रानी'मध्ये बाजीराव पेशव्यांची भूमिका करणार हा अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2019 11:59 AM

विकास कश्यप बाजीरावाची मध्यवर्ती भूमिका करणार आहेत जो उमदा आणि आदरणीय देशभक्त होता. या शोमध्ये पेशवे इंग्रजांच्या विरूध्द चालू असलेल्या भूमिगत चळवळीला पाठिंबा देत आहेत. प्रामाणिक दृष्टिकोनासाठी ज्ञात असलेले ते अनेक लोकांन सांभाळत होते.

छोट्या पडद्यावर आगामी ऐतिहासिक नाट्य खूब लडी मर्दानी-झांसी की रानी मध्ये सामान्य मनकर्णिकेची कहाणी सादर केली जाणार आहे, जी झाशीची लढवैय्या राणी म्हणून प्रसिध्द झाली, आणि त्यामुळे आपल्या देशाच्या इतिहासाचा महत्वाचा भाग बनली आहे.

पराक्रमी राणी म्हणून प्रसिध्द असलेल्या या राणीचा या शो मधून मनकर्णिकेला एक लढवैय्यी म्हणूनच सादर केले आहे असे नाही तर या धाडसी मुलीची कनवाळू बाजू सुध्दा सादर केली जाणार आहे. झाशीला भारताच्या नकाशावर आणण्यासाठी तिने केलेल्या अंतर्गत आणि बाह्य लढायांचा सुध्दा यात समावेश असणार आहे. ही लक्षवेधक भूमिका करत आहे तरूण आणि हुशार अनुष्का सेन. अनुष्का सेनला सामील होत आहे नामवंत अभिनेता विकास कश्यप, ज्यांनी गांधी सारख्या उल्लेखनीय सिनेमात आणि काही लोकप्रिय ऐतिहासिक मालिकां मध्ये काम केलेले आहे.

विकास कश्यप बाजीरावाची मध्यवर्ती भूमिका करणार आहेत जो उमदा आणि आदरणीय देशभक्त होता. या शोमध्ये पेशवे इंग्रजांच्या विरूध्द चालू असलेल्या भूमिगत चळवळीला पाठिंबा देत आहेत. प्रामाणिक दृष्टिकोनासाठी ज्ञात असलेले ते अनेक लोकांन सांभाळत होते.

शोमध्ये सहभागी झाल्या विषयी बोलताना, विजय कश्यप म्हणाले,खूब लडी मर्दानी-झाशी की रानी मध्ये सहभागी झाल्याचा मला आनंद होत आहे. यात झाशीच्या सिंहाचे काळीज असलेल्या मनकर्णिका या झाशीच्या राणीची प्रख्यात कहाणी जिवंत केला आहे. देशातील स्वतंत्रतेचे बीज पेरण्यात ज्या काही पराक्रमी लोकांचा हात होता त्यात बाजीराव पेशव्यांचा समावेश आहे आणि ती भूमिका मला साकारायला मिळाली यात माझा सन्मान आहे, ते जेव्हा मोठ्या प्रमाणावर लोकांचा विचार केला जातो तेव्हा जे योग्य असेल त्याच्या बाजूने ते कायम उभे राहिले होते. या कथेमध्ये झाशीच्या या प्रसिध्द राणीची अगदी वेगळी बाजू दाखविण्यात येणार आहे, त्यामुळे टेलिव्हिजन वर सध्या चालू असलेल्या शो पेक्षा हा शो वेगळा ठरणार आहे.”