Join us  

Bigg boss 17: 'सहानभुतीसाठी अंकिता करायची सुशांतच्या नावाचा उल्लेख?'; विकीने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2024 12:09 PM

Vicky jain: विकीने एका मुलाखतीमध्ये अंकिता सतत बिग बॉसमध्ये सुशांतच्या नावाचा उल्लेख का करायची हे सांगितलं आहे.

दबंग खान अर्थात सलमान खान (salman khan) याचा 'बिग बॉस' (bigg boss) हा शो कायमच चर्चेत असतो. यंदा या शोचं 17 वं पर्व पार पडलं. मात्र, हे पर्व त्यात देण्यात येणाऱ्या टास्कपेक्षा अभिनेत्री अंकिता लोखंडे (ankita lokhande) आणि तिचा पती विकी जैन (vicky jain) यांच्यामुळे चर्चेत राहिलं. या शोमध्ये अंकिता-विकी यांचं सतत वाद झाल्यामुळे त्यांच्या नात्याची दुसरी बाजू प्रेक्षकांसमोर आली.तर, या कार्यक्रमात अंकिताने सतत दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत (sushant singh rajput)  याच्या नावाचा उल्लेख केला. अनेकांनी ती सहानभुती मिळवण्यासाठी त्याच्या नावाचा वापर करत असल्याचं म्हटलं होतं. या सगळ्यावर आता विकीने त्याची प्रतिक्रिया दिली आहे.

एकेकाळी अंकिता आणि सुशांत एकमेकांना डेट करत होते. मात्र, काही कारणास्तव ही जोडी विभक्त झाली. त्यानंतर सुशांतच्या मृत्युनंतर अंकिता पुन्हा एकदा चर्चेत आली. यामध्येच बिग बॉसच्या घरातही ती सातत्याने सुशांतच्या नावाचा उल्लेख करायची. त्यामुळे केवळ हा शो जिंकण्यासाठी ती सुशांतच्या नावाचा वापर करतीये. त्याच्या नावाचा उल्लेख करुन ती लोकांची सहानभूती मिळवण्याचा प्रयत्न करतीये असे अनेक आरोप नेटकऱ्यांनी तिच्यावर केले. यावरच आता विकीने मोठा खुलासा केला आहे. विकीने ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये याविषयी भाष्य केलं आहे.

नेमकं काय म्हणाला विकी?

अंकिता जेव्हा नॅशनल टीव्हीवर सतत सुशांतच्या नावाचा उल्लेख करायची त्यावेळी तुला त्रास झाला का? असा प्रश्न विकीला विचारण्यात आला होता. त्यावर, अंकिताला सुशांतची आठवण येत असेल तर मला त्याचा काहीच प्रॉब्लेम नाहीये. अंकिता या इंडस्ट्रीचा भाग आहे आणि सुशांतसोबत तिचं नातं होतं हे सगळ्यांनाच ठावूक आहे. त्यामुळे सगळेच जण तिला सुशांतविषयी प्रश्न विचारतात. त्यामुळे ती सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देते, असं विकी म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "अंकिता आता सगळं मागे सोडून आयुष्यात पुढे गेली आहे. तिच्या मनात सुशांतविषयी आता काहीच नाही. त्यामुळेच तिला तिच्या भूतकाळाविषयी बोलताना त्रास होतो." दरम्यान, बिग बॉस 17 मधून बाहेर पडल्यानंतर विकी आणि अंकिता या दोघांनाही मोठे प्रोजेक्ट मिळाल्याचं सांगण्यात येत आहे.

टॅग्स :अंकिता लोखंडेसुशांत सिंग रजपूतबिग बॉससलमान खान