वत्सलचा कमबॅक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2016 16:25 IST
‘एक हसिना थी’ या मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता वत्सल सेठ गेल्या अनेक महिन्यांपासून छोट्या पडद्यावरून गायब होता. पण आता ...
वत्सलचा कमबॅक
‘एक हसिना थी’ या मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता वत्सल सेठ गेल्या अनेक महिन्यांपासून छोट्या पडद्यावरून गायब होता. पण आता वत्सल अनेक महिन्यांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्यास तयार आहे आहे. वत्सल लाईफ ओकेवर लवकरच सुरू होणाºया ‘रिश्तो का सौदागर-बाजीगर’ या मालिकेत काम करणार आहे. या मालिकेत प्रेक्षकांना एक सुरेख प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. वत्सल एमबीएचे शिक्षण घेतलेल्या अतिशय हुशार मुलाची भूमिका या मालिकेत साकारत आहे. हा मुलगा अतिशय चांगला असला तरी यात काही अवगुणही आहेत. त्याची ही भूमिका काहीशी नकारात्मकही असल्याचे तो सांगतो.