Join us  

'वीर शिवाजी' मालिकेचे ज्येष्ठ लेखक - अभिनेते काळाच्या पडद्याआड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2024 1:31 PM

वीर शिवाजी मालिका घराघरात पोहचवणारे अभिनेते - लेखक यांची प्राणज्योत मालवली आहे.

काहीच दिवसांपुर्वी गायक पंकज उधास यांचं निधन झालं. आता मनोरंजन विश्वातून आणखी एक दुःखद बातमी समोर आलीय. 'वीर शिवाजी', 'झॉंसी की रानी' मालिकेचे लेखक मेराज जैदी यांचं निधन झालंय. मेराज यांनी प्रयागराज येथील दांदूपुर भागातील आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. ते ७६ वर्षांचे होते. मेराज गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते.

मेराज यांनी 'झांसी की रानी', 'वीर शिवाजी', 'शोभा सोमनाथ की', 'आपकी अंतरा', 'राजा का बाजा' यांसारख्या लोकप्रिय मालिकांचं संवाद आणि कथालेखनाची जबाबदारी सांभाळली आहे. याशिवाय मेराज यांची ख्यातनाम दिग्दर्शक, गीतकार आणि अभिनेता म्हणूनही ओळख होती.

मेराज यांनी केवळ लेखनक्षेत्रात मुशाफिरी केली नाही. तर अभिनय क्षेत्रही चांगलंच गाजवलं. हॉलिवूडमधील प्रसिद्ध 'गोंगर 2' सिनेमात त्यांनी अभिनय करुन छाप पाडलीय. याशिवाय हबीब तनवीरसोबत त्यांनी 'आगरा बाजार', 'मृतक बिहारी लाल हाजिर हों', 'शहर में कर्फ्यू', 'रामचरन चोर' यांसारख्या अनेक शोची जबाबदारी सांभाळली.

 

टॅग्स :छत्रपती शिवाजी महाराजटेलिव्हिजन