Join us

“आज काय स्पेशल”मध्ये वरूण इनामदार यांना मिळाले 'व्हॅलेंटाइन' डे चे खास सरप्राईझ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2018 13:14 IST

बऱ्याच लोकांना खाण्याची आवड नसून दुसऱ्यांना वेगवेगळे पदार्थ बनवून देण्याची आवड असते. पण एखादा पदार्थ चांगला आहे कि वाईट ...

बऱ्याच लोकांना खाण्याची आवड नसून दुसऱ्यांना वेगवेगळे पदार्थ बनवून देण्याची आवड असते. पण एखादा पदार्थ चांगला आहे कि वाईट याची पारख एक उत्तम खवय्याच करू शकतो. कलर्स मराठी अश्याच खवय्यांसाठी एक रुचकर कार्यक्रम काही महिन्यांपूर्वी घेऊन आला “आज काय स्पेशल”. या कार्यक्रमामध्ये प्रशांत दामले महाराष्ट्रातील खवय्यांच प्रतिनिधीत्व करत असून बरेच सुप्रसिध्द कलाकार या कार्यक्रमामध्ये येऊन गेले ज्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे रुचकर पदार्थ करून प्रेक्षकांची मने जिंकली. व्हॅलेंटाइन डे हा प्रत्येक प्रेमात पडलेल्या व्यक्तीसाठी खास असतो. कोणी तो आपल्या आईसोबत मन्वतो तर कोणी बायको – नवऱ्यासोबत तर कोणी मित्र - मैत्रींणी सोबत. ‘प्रेम’ ही कधीच न बदलणारी संकल्पना असून, ती नेहमीच एका नव्या रुपात आपल्यासमोर येत असते. प्रेमाच्या बेधुंद लहरीत रंगणा-या प्रेमीयुगुलांसाठी तर प्रेमाचा प्रत्येक दिवस नव्याने प्रेमात पाडणारा असतो.  कलर्स मराठीवरील “आज काय स्पेशल” या कार्यक्रमामध्ये देखील व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यात आला पण एका अनोख्या पध्दतीने. प्रशांत दामले यांनी कार्यक्रमामधील शेफ वरूण इनामदार यांना व्हॅलेंटाइन डे निमित्ताने एक खास सरप्राईझ दिले. आणि ते म्हणजे वरूण यांच्या पत्नीस तेजश्री हिला त्यांनी थेट कार्यक्रमामध्ये आणले.या खास भागामध्ये वरूण यांनी आपल्या बायकोसाठी strawberry & white chocolate pudding, chocolate fudge या दोन गोष्टी बनवल्या. याचबरोबर त्यांनी प्रशांत दामले यांच्याशी मनसोक्त गप्पा देखील मारल्या. वरुण यांनी त्यांच्या सुंदर लव्ह स्टोरी बद्दल देखील प्रेक्षकांना सांगितले तसेच पहिल्यांदा त्यांनी तेजश्री साठी पुडिंग बनविल्याचे देखील सांगितले. काही दिवसांपूर्वीच या शोमध्ये नाना पाटेकर यांनी हजेरी लावली होती. नानांनी याठिकाणी चविष्ठ रुचकर मटण आणि अळूचं फदफद प्रेक्षकांना बनवून दाखवले होते. या कार्यक्रमामध्ये नानांनी त्यांची आवडती डिश बनवताना प्रशांत दामलेंशी दिलखुलास गप्पा देखील मारल्या. यावेळी त्यांनी आपला मानूस चित्रपटाच्या चित्रकरणा दरम्यानच्या अनेक आठवणी त्यांनी सांगितल्या.