Join us  

वैदही व मानस लवकरच अडकणार लग्नबेडीत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 10:59 AM

'फुलपाखरू' मालिकेत 29 जुलैला वैदही व मानसचा भव्य विवाह सोहळा

ठळक मुद्देलग्नसराईची जंगी तयारी पाहता येणार 'फुलपाखरू' मालिकेत

झी युवा वाहिनीवरील 'फुलपाखरू' मालिका तरूणाईमध्ये खूप लोकप्रिय आहे. महाविद्यालयीन आयुष्यातील पहिले प्रेम, हे कोणत्याही महाविदयालयातील तरुण तरुणीच्या अगदी जवळचा विषय असतो. त्यात मानस आणि वैदेही सारखी गोड जोडी आणि त्यांची अनोखी प्रेमकहाणी सगळ्यानांच भावली. अल्पावधीतच 'फुलपाखरू' मालिकेतील वैदेही म्हणजेच अभिनेत्री ऋता दुर्गुळे सर्वांची लाडकी झाली आहे तर मानस म्हणजेच यशोमन आपटेने मुलींना चांगलीच भुरळ पाडली आहे. नुकतेच या मालिकेने वर्षपूर्ती करून आपण किती लोकप्रिय आहोत हेच दाखवून दिले. मात्र आता अनेक मुलामुली नाराज होणार आहेत. तर काही जणांचा आनंद गगनात मावणार नाही. कारण एकमेकांवर अतोनात प्रेम करणाऱ्या वैदेही मानसचे लग्न ठरले आहे. 

मानस व वैदेहीचा २९ जुलै दुपारी १२ वाजता आणि ७ वाजता छोट्या पडद्यावरील हा भव्य विवाह सोहळा झी युवावर पाहायला मिळणार आहे  आणि २३ जुलै  ते २८ जुलै दररोज रात्री ९ वाजता लग्नसराईची जंगी तयारी संपूर्ण आठवडाभर गाजेल. कॉलेजच्या अल्लड वयात जुळलेले प्रेम, त्यांचा एकमेकांवरचा लटका राग, त्यांची खोडकर मस्ती, थोडे रुसवे - फुगवे, एकमेकांवर निरपेक्ष प्रेम करणाऱ्या मानस आणि वैदेहीची ही प्रेमकथा म्हणजे 'फुलपाखरू'. या कार्यक्रमात प्रेक्षकांनी अनेक ट्विस्ट्स अँड टर्न्स अनुभवले. वैदेही आणि मानस यांच्या प्रेमकथेतील अनेक चढउतारानंतर आता हे दोघेही लग्नबेडीत अडकणार आहेत. महाविद्यालयीन प्रेम हे फार कमी प्रमाणात घरापर्यंत पोहोचते आणि त्याहूनही कमी जोडप्यांचे प्रत्यक्षात लग्न होते.

'फुलपाखरू' मालिकेत प्रेमाचे हे सर्व टप्पे अतिशय सुंदरतेने दाखवले गेले आणि आता त्यांच्या नात्याला मिळणारे हे नवीन रूप लोकांच्या लोकप्रियतेचे शिखर गाठेल. येत्या काही भागात वैदेही आणि मानस यांची लगीनघाई प्रेक्षक पाहू शकणार आहेत. दोन्ही घरात लग्नाची लगबग आणि खरेदी सुरु होणार आहे. वैदेहीला आई नसल्यामुळे मानसची आई वैदेहीला लग्नाचा पोशाख घेण्यात मदत करणार आहे. दोन्ही कुटंबे त्यांची घरे सजवून लग्नाच्या तयारीला सुरूवात करतील. कुटुंबीय आणि मित्रपरिवार हा लग्न सोहळा तसेच संगीत, मेहदी आणि इतर समारंभ कसे दिमाखदार करता येतील या तयारीत असतील. लग्नाच्या गाठी स्वर्गातबांधल्या जातात आणि मानससारख्या जोडीदारासोबत देवाने वैदेहीची गाठ बांधली आहे. त्यामुळे हा भव्य लग्नसोहळा झी युवावर पाहणे हे प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे.  

टॅग्स :फुलपाखरू