Join us

उर्मिला करणार नृत्याचे परीक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2016 15:53 IST

मोठ्या पडद्यावरचे अनेक कलाकार छोट्या पडद्यावरील अनेक रिअॅलिटी शोमध्ये झळकत आहेत. या मोठ्या पडद्यावरील कलाकारांमध्ये आणखी एका कलाकाराची भर ...

मोठ्या पडद्यावरचे अनेक कलाकार छोट्या पडद्यावरील अनेक रिअॅलिटी शोमध्ये झळकत आहेत. या मोठ्या पडद्यावरील कलाकारांमध्ये आणखी एका कलाकाराची भर पडणार आहे. उर्मिला मातोंडकर एका डान्स रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालन करणार आहे. निर्माते राजेश कुमार शाईन ऑफ इंडिया हा डान्स रिअॅलिटी शो घेऊन येत आहेत. या डान्स रिअॅलिटी शोचे भारतातील दहा शहरात लवकरच ऑडिशन होणार आहे. उर्मिलासोबत राजेशदेखील या शोमध्ये परीक्षकाची भूमिका साकारणार आहे. तिसऱ्या परीक्षकाची सध्या शोधाशोध सुरू आहे.