Join us

​ उमेशची सायकल रायडींग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2016 12:48 IST

           रिल लाईफ़ मध्ये अ‍ॅडव्हेंचरस सीन करता करता उमेश कुमावतने रिअल लाईफ मध्ये सुद्धा ...

           रिल लाईफ़ मध्ये अ‍ॅडव्हेंचरस सीन करता करता उमेश कुमावतने रिअल लाईफ मध्ये सुद्धा खंडाळा घाटात सायकल रायडिंग करुन हम भी किसीसे कम नही हेच दाखवून दिले आहे. सीएनएक्सने त्याच्याशी केलेल्या खास बातचीतमध्ये त्याने सांगितले कि, मी काही हे टारगेट ठरवून पुर्ण केले नाही. माझ्या मनात फक्त विचार आला आपण सायकल रायडींग करु आणि मला माझे गुरु शैलेश परुळेकर भेटले. त्यांनी खुप मार्गदर्शन केले. मी सुरुवातीला ४-६ महिने मुंबईच्या रस्त्यावरुन २० मिनिटे, मग अर्धा तास मग एक तास अशी सायकल चालवली. त्यानंतर २५ ते ५० किलोमीटर असा पल्ला हळुहळु  गाठू लागलो. माझे टारगेट खंडाळा होते. पण आधी खोपोली पर्यंत जाऊ असे ठरवले. खोपोलीला आल्यानंतर इथपर्यंत आलोच आहे तर खंडाळ््याला जाऊ असे ठरवले आणि पुढची जर्नी कन्टीन्यु केली. चेंबुर येथील माझ्या घरापासुन मी निघालो आणि ४.३० तासात ८० किलोमीटरचा प्रवास पुर्ण केला. माझा हा एक्सपीरियन्स खरच खुप भारी होता. आय अ‍ॅम वेरी हॅपी अशा भावना त्याने व्यक्त केल्या.