उमेशने घेतला गावसकरांचा अॅटोग्राफ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2016 04:01 IST
क्रिकेटचे वेड कोणाला नसते हो. क्रिकेटर्सच्या प्रेमात पडणाºया त्यांच्या चाहत्यांची संख्या काही कमी नाही. आपल्या ...
उमेशने घेतला गावसकरांचा अॅटोग्राफ
क्रिकेटचे वेड कोणाला नसते हो. क्रिकेटर्सच्या प्रेमात पडणाºया त्यांच्या चाहत्यांची संख्या काही कमी नाही. आपल्या आवडच्या क्रिकेटरची एक झलक पाहण्यासाठी त्यांचे चाहते हजारो रुपयांची तिकीटे खरेदी करुन स्टेडीअमवर तुफान गर्दी करतात. परंतू चित्रपटांच्या मायावी नगरीतील स्टार्र्स देखील या क्रिकेटर्सचे फॅन आहेत असे सांगितले तर वावगे ठरणार नाही. आता पहा ना नूकतेच अभिनेता उमेश कामत याने सुनिल गावसकर यांच्यासोबत फोटो काढले. एवढेच नाही तर त्याला गावसकरांचा अॅटोग्राफ घेण्याचा मोह देखील आवरता आला नाही. उमेशने बुक किंवा हातावर नाही तर चक्क त्याने अंगात घातलेल्या त्याच्या ग्रे कलरच्या टि-शर्ट वरच गावसकरांचा अॅटोग्राफ घेतला आहे. उमेशला तो अॅटोग्राफ मिळाल्याचा इतका आनंद झाला की तो म्हणतोय नेवर गोईंग टू वॉश धिस टि-शर्ट. ज्या कलाकारांच्या एका अॅटोग्राफसाठी त्यांचे चाहते वेडे असतात अशा कलाकारांना देखील त्यांच्या आयडल पर्सनच्या अॅटोग्राफचे वेड असते हेच यातून पहायला मिळते.