Join us  

‘कर्णसंगिनी’साठी उदित नारायणने यांनी गायला खास श्लोक!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2018 9:58 AM

आपल्या मृदू आवाजाने आश्वासक गीते गाणारे बॉलीवूडचे गायक ‘कर्णसंगिनी’साठी भगवद्गीतेतील एक खास संस्कृत श्लोक गाणार आहे

ठळक मुद्दे कर्ण आणि अर्जुन यांची ही एक अनोखी प्रेमकथा आहे.

आपल्या मृदू आवाजाने आश्वासक गीते गाणारे बॉलीवूडचे गायक ‘कर्णसंगिनी’साठी भगवद्गीतेतील एक खास संस्कृत श्लोक गाणार आहे. ‘कर्णसंगिनी’ ही महाभारताच्या पार्श्वभूमीवरील राजकन्या उरुवी, कर्ण आणि अर्जुन यांची ही एक अनोखी प्रेमकथा आहे. उरुवीने आपल्या प्रेमासाठी साऱ्या सुखसोयींचा कसा त्याग केला, त्याची ही कथा आहे. या श्लोकाच्या कल्पनेने उदित नारायण आनंदित झाला असून येत्या काही दिवसांतच तो हा श्लोक ध्वनिमुद्रित करतील.  सर्व सुरळीत पार पडले, तर हा श्लोक या मालिकेचे संकल्पन गीतही ठरेल. उदित नारायणच्या आवाजातील हा विशेष श्लोक ऐकण्याची आम्हाला फार उत्सुकता लागली आहे.

कर्णसंगिनी' ही कविता काणे यांची कादंबरी कर्णाज्‌ वाईफः दि आऊटकास्ट क्वीनवर आधारित आहे. महाभारताच्या पार्श्वभूमीवरील 'कर्णसंगिनी' या मालिकेत सामाजिक प्रथेच्या विरोधात जाऊन जातीबाहेर टाकलेल्या राजा कर्णशी लग्न करणाऱ्या उरुवीची कथा सादर करण्यात आली आहे. महाकाव्य महाभारताची माहिती नसलेली बाजू या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यात कर्ण, उरुवी आणि अर्जुनाच्या प्रेमाच्या त्रिकोणाबद्दल प्रेक्षकांना जाणून घेता येणार आहे. कधीही सांगण्यात न आलेल्या कर्ण आणि त्याची जोडीदार उरुवीच्या या कथेमधून सर्व सामाजिक आणि वर्गांच्या मर्यादा लांघणारी प्रेमकथा पाहायला मिळेल. ही मालिका शशी सुमित प्रॉडक्शन्सनी बनवला असून यात अशिम गुलाटी कर्णाच्या रूपात, तेजस्वी प्रकाश ऊरूवीच्या रूपात तर किंशुक वैद्य अर्जुनाच्या रूपात दिसून येणार आहे.

टॅग्स :कर्णसंगिनीउदित नारायण