Join us  

आंबेडकर जयंतीनिमित्त 'एक देश एक आवाज' उपक्रमाच्‍या माध्‍यमातून कलाकार देणार खास मानवंदना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 6:39 PM

सर्व कलाकार एकत्र येऊन या देशाप्रती भरीव योगदान देणारे बाबासाहेब यांना खास मानवंदना देण्‍याचे आवाहन करत आहेत. 

आहेत डॉ. बी. आर. आंबेडकर, ज्‍यांना आदरपूर्वक 'बाबासाहेब' म्‍हटले जाते. त्‍यांचे जीवन व वारसा अनेकांसाठी प्रेरणास्रोत राहिला आहे. यंदाच्‍या आंबेडकर जयंतीनिमित्त &TV ने बाबासाहेबांना आणि त्‍यांच्‍या संघटित भारताच्‍या दृष्टिकोनाला खास मानवंदना देण्‍यासाठी 'एक देश एक आवाज' उपक्रम सादर केला आहे. या उपक्रमाचा भाग म्‍हणून चॅनेल सर्वांना भीमवंदनासाठी एकत्र येण्‍याचे आणि १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता फक्‍त &TV वर बाबासाहेबांना खास मानवंदना देण्‍याचे आवाहन करत आहे. भारतीय संविधानाचे शिल्‍पकार डॉ. बी. आर. आंबेडकर एक सर्वोत्तम नेता होते आणि त्‍यांचा वारसा अद्वितीय आहे. त्‍यांचा विश्‍वास होता की, एक देश एक संविधानाचा एकीकृत नियम सुरू केला तरच भारतामध्‍ये राष्‍ट्रीय एकता व स्थिरतेला चालना मिळेल. 

देशाला एका संविधानाच्‍या माध्‍यमातून एकत्र आणण्‍याचे थोर कार्य करणा-या या महामानवाबाबत टेलिव्हिजन कलाकारांची मते:

 

प्रसाद जावडे म्‍हणाला, ''डॉ. बी. आर. आंबेडकर यांनी एक देश व एक संविधान या नियमांतर्गत लाखो भारतीयांना एकत्र आणत संघटित भारताचा पाया रचला. त्‍यांची शिकवण व तत्त्वज्ञान आजही देशभरातील भारतीयांमध्‍ये दिसून येते. १४ एप्रिल रोजी बाबासाहेबांची १२९ची जयंती साजरी केली जाणार असताना मी सर्वांना &TV वर रात्री ८ वाजता एकत्र येत या महामानवाला खास मानवंदना देण्‍याचे आवाहन करतो.''  

नेहा जोशी:

 ''बाबासाहेब खरंच एक दूरदर्शी नेते होते. आज आपल्‍या देशाने केलेल्‍या प्रगतीचे बरेच श्रेय त्‍यांना जाते. त्‍यांनी लोकांना एकत्र आणण्‍यासोबत सर्व प्रकारच्‍या दडपशाहीविरोधात उभे राहण्‍यासाठी प्रेरित देखील केले. यंदाच्‍या आंबेडकर जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता &TVवर सर्वांनी एकत्र येऊन बाबासाहेबांना आदरांजली देऊया.'' 

जगन्‍नाथ निवंगुणे :

 

''डॉ. आंबेडकर हे सर्वोत्तम नेते होते. त्‍यांच्‍या कार्याचा सर्व भारतीयांच्‍या जीवनाला स्‍पर्श झाला आहे आणि प्रभाव पडला आहे. आंबेडकर जयंतीनिमित्त मी सर्वांना &TV वर रात्री ८ वाजता बाबासाहेबांना खास मानवंदना देण्‍यासाठी आमच्‍यासोबत सामील होण्‍याचे आवाहन करतो.'' 

स्‍नेहा वाघ :

 

''बाबासाहेब अनेकांसाठी प्रेरणास्रोत राहिले आहेत. भारतीय लोकशाहीमध्‍ये आमूलाग्र बदल घडवून आणलेल्‍या क्रांतीला चालना देण्‍याच्‍या क्षमतेमुळे त्‍यांना सर्वात महान नेत्‍यांपैकी एक बनवले. चला तर मग यंदाच्‍या आंबेडकर जयंतीला सर्वांनी एकत्र येऊन त्‍यांना खास मानवंदना देऊया. 

रोहिताश्‍व गौड:

 

''डॉ. बी. आर. आंबेडकर हे महान दूरदर्शी नेते होते. विविध सामाजिक व आर्थिक सुधारणांच्‍या माध्‍यमातून, तसेच अर्थातच भारतीय संविधान रचण्‍याच्‍या माध्‍यमातून आपल्‍या देशाला संघटित देश बनवण्‍याचे त्‍यांचे स्‍वप्‍न होते. एकत्र येत महान नेता व समाजसुधारक 'डॉ. बी. आर. आंबेडकर' यांना खास मानवंदना देण्‍याचे आवाहन करतो.'' 

आसिफ शेख:

 

''मी डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्‍या कथा वाचत मोठा झालो आहे आणि समानतेप्रती त्‍यांच्‍या लढ्याचा माझ्यावर मोठा प्रभाव आहे. डॉ. आंबेडकर हे आधुनिक भारतातील समानता व बंधुत्‍वाचे सर्वात शक्तिशाली समर्थक राहिले आहेत.  या देशाप्रती भरीव योगदान देणारे बाबासाहेब यांना खास मानवंदना देण्‍याचे आवाहन करतो.'' 

ग्रेसी सिंग:

 ''बाबासाहेब हे भारतीय इतिहासामधील सर्वात महान व्‍यक्तिमत्त्‍वांपैकी एक आहेत. समानता, महिला सक्षमीकरणाप्रती त्‍यांचा लढा असो किंवा शिक्षणाच्‍या सुधारणेमध्‍ये त्‍यांचा सहयोग असो त्‍यांचा प्रत्‍येक भारतीयाच्‍या जीवनावर प्रभाव आहे. आम्‍ही रात्री ८ वाजता &TV वर आमच्‍या खास मानवंदनेच्‍या माध्‍यमातून बाबासाहेबांचा आदर करणार असताना मी माझ्या सर्व चाहत्‍यांना आंबेडकर जयंती साजरी करण्‍यासाठी या उपक्रमामध्‍ये सामील होण्‍याचे आवाहन करते.'' 

 

योगेश त्रिपाठी:

''डॉ. आंबेडकर यांनी स्‍वातंत्र्य, समानता व बंधुत्‍वावर आधारित आपला एक समाज असण्‍याची कल्‍पना मांडली. अनेक जीवनांमध्‍ये आमूलाग्र बदल घडवून आणणा-या सामाजिक व आर्थिक सुधारणा घडवून आणण्‍यासाठी महान दृष्टिकोन व विश्‍वास असणे गरजेचे असते. बाबासाहेबांप्रमाणे इतर काही नेतेच देशाला सं‍घटित करू शकले.

टॅग्स :ग्रेसी सिंग