Join us

टीव्ही कलाकार असे करतात दिवाळी सेलिब्रेशन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2017 15:54 IST

दिव्याचा सण म्हणजे दीपावली... लज्जतदार फराळ, मिठाईचा गोडवा आणि फटाक्यांची आतषबाजी करत हा सण सारेच धुमधडाक्यात साजरा करतात. सेलिब्रेटीमंडळीसुद्धा ...

दिव्याचा सण म्हणजे दीपावली... लज्जतदार फराळ, मिठाईचा गोडवा आणि फटाक्यांची आतषबाजी करत हा सण सारेच धुमधडाक्यात साजरा करतात. सेलिब्रेटीमंडळीसुद्धा याला अपवाद नाही. शूटिंग बिझी शेड्युल बाजूला सारत ही मंडळीसुद्धा दिवाळी दणक्यात साजरा करतात. अशाच काही सेलिब्रेटींनी मनाच्या कोप-यात या सणाबद्दल असलेल्या भावना आणि आठवणी शेअर करत रसिकांना शुभेच्छा दिल्या.रतन राजपूतदिवाळीत मी नेहमीच धम्माल करतो. माझी बहिण रांगोळी काढते तर आई खास मिठाई बनवते. सारा आसमंत दिव्याच्या प्रकाशानं न्हाऊन जातो. प्रत्येकाच्या चेह-यावर आनंद आणि नवी ऊर्जा घेऊन येणारा हा सण आगळावेगळा आहे. बालपणी फटाक्यांच्या आवाजाला किती घाबरायचो हे आठवलं की आजही माझं मला हसू आवरत नाही. मात्र आता परिस्थिती बदललीय. मात्र कामाच्या व्यापामुळे तशी मजा करता येत नसली तरी थोडा वेळ का होईना मित्रांसोबत सेलिब्रेट करतो. हा सण सा-यांच्या जीवनात आनंददायी क्षण घेऊन येवो याच शुभेच्छा.कृतिका सेनगर कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी करण्याची मजा काही वेगळीच असते. या सणाच्या वेळी सारं कुटुंब एकत्र येऊन अक्षरक्षा धम्माल करतं. त्यात भावाकडून भाऊबीजला मिळणारं गिफ्ट म्हणजे फायदाच फायदा.. शिवाय आईला मिठाई बनवण्यासाठी मदत करणे आणि रांगोळी काढणं मला खूप आवडतं.अदिती गुप्ताबालपणीच्या दिवाळीच्या आठवणी आजही ताज्या आहेत. माझा भाऊ आणि मी नवे कपडे, फटाके, मिठाई खरेदी करण्यासाठी दिवाळीची आतुरतेने वाट पाहायचो. दिव्यांनी घरं सजवणं आणि रांगोळी काढणे याची मजाही काही और होती. मात्र आता वर्ष निघून गेलीत तशा पद्धतीने मजा करणं कमी झालीय. शुटिंगचा बिझी शेड्युलमुळे भावासोबत फटाके फोडण्याची मजा घेता येत नाही. पण शुटिंगमधून वेळ मिळाला तर त्याहून आनंदाची गोष्ट नाही. मी नक्कीच कुटुंबासह पूजेला हजेरी लावते. त्यात नव्या कपड्यांचं आकर्षण आजही काही कमी झालेलं नाही. सो एन्जॉय दिवाळी.मेघा गुप्तादिव्याच्या लख्ख प्रकाशानं आसमंत उजळून टाकणारा हा सण मला आधीपासून खूप आवडतो. घराच्या अंगणात रांगोळी काढणं आणि फटाक्यांची आतषबाजी करणे यासारखा दुसरा आनंददायी क्षण नाही. मात्र सध्या मी सुद्धा ध्वनी प्रदूषण टाळत दिवाळी साजरी करण्याला महत्व देते. हा एक सण असा आहे की ज्यावेळी कुटुंब आणि मित्रासोबत फराळ- मिठाई खात एन्जॉय करता येतो. सध्या सिरीयलच्या शुटिंगमुळे पूर्णवेळ कुटुंबासह दिवाळी साजरी करणे शक्य होणार नाही. तरी एक दिवस तरी नक्कीच कुटुंबासह दिवाळीचा जल्लोष करणार. सर्व रसिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.