Join us  

Video : या आशियातील सर्वात मादक अभिनेत्रीने गमतीगमतीत खाल्ले ‘फायर पान’, अशी झाली अवस्था!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2019 10:49 AM

ही टीव्ही अभिनेत्री कायम ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते. बोल्ड व्हिडिओ आणि बिकनीतील हॉट फोटो शेअर केल्यामुळे ती अनेकदा ट्रोल झाली आहे. सध्या ती एका मजेशीर व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे.

ठळक मुद्देसोशल मीडियावर निया कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोवर्स आहेत.

टीव्ही अभिनेत्री निया शर्मा कायम ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते. बोल्ड व्हिडिओ आणि बिकनीतील हॉट फोटो शेअर केल्यामुळे  निया अनेकदा ट्रोल झाली आहे. अगदी लिपस्टिकच्या रंगावरूनही नियाला लोकांनी नाही-नाही ते सुनावले आहे. पण सध्या निया तिच्या एका मजेशीर व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. होय, सध्या नियाचा एका व्हिडीओ वेगाने व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये निया इंदूरच्या एका पानाच्या दुकानासमोर उभी असून पान खाताना दिसतेय. पण हे साधेसुधे पान नसून ‘फायर पान’आहे. हा व्हिडिओ इतका मजेशीर आहे की, तो पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू आवरणार नाही.

दुकानदार नियाचा ‘फायर पान’ बनवून देतो. पण या पानातून आग निघताना पाहून नियाची घाबरगुंडी उडते. हे पान खाऊ की नको, असे तिला होते. सुरुवातीला ती घाबरून मागे होते. पण दुकानदार ‘फायर पान’ पान देतो आणि ते तोंडात गेल्यानंतर नियाचा चेहरा बघण्यासारखा होतो.

आशियातील दुसºया मादक स्त्रीचा किताब मिळवणारी २७ वर्षांची निया शर्मा टीव्हीवरची सर्वाधिक बोल्ड अन् ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून परिचित आहे. ‘एक हजारों में मेरी बहना है’ या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. यानंतर ती ‘जमाई राजा’ या मालिकेत दिसली. यापाठोपाठ ‘खतरों के खिलाडी’च्या आठव्या सीझनमध्येही ती दिसली. निया कायम तिच्या हॉट फोटोशूटमुळे चर्चेत असते.

सोशल मीडियावर निया कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोवर्स आहेत. सध्या ती ‘इश्क मे मरजावाँ’ मध्ये आरोहीची भूमिका साकारते आहे. 2017 मध्ये ‘सेक्सिएस्ट एशियन वूमन’च्या यादीत निया तिस-या स्थानावर होती. पण 2018 मध्ये मात्र तिने तिस-या स्थानावरून दुस-या स्थानावर उडी घेतली होती.लंडन येथील ’इस्टर्न आय’ या मॅगझिनने ही 50  ‘सेक्सिएस्ट एशियन वूमन’ची यादी जाहीर केली होती. 

टॅग्स :निया शर्मा