Join us  

दीपिका सिंहच्या आईला झालीय कोरोनाची लागण, पण रुग्णालयांनी दाखल करण्यास दिलाय नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 2:13 PM

दिया और बाती फेम दीपिका सिंहची आई दिल्लीत राहात असून त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तिच्या आजीमध्ये आणि वडिलांमध्ये देखील कोरोनाची लक्षणं दिसत आहेत.

ठळक मुद्देदीपिकाने केजरीवाल यांना विनंती केली आहे की, कृपया माझ्या कुटुंबियांना मदत करावी. मी खूप टेन्शनमध्ये आहे. काय करावे हेच मला कळत नाहीये. मी सध्या मुंबईत आहे. माझ्या आईला कोणतेच रुग्णालय दाखल करून घ्यायला तयार नाहीये.

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून भारतात देखील अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने अनेक रुग्णालयांमध्ये रुग्णांना दाखल करून घ्यायला देखील जागा शिल्लक नाहीये. सरकारी, खाजगी सगळ्याच रुग्णालयाची अवस्था सध्या चांगलीच बिकट आहे. या सगळ्यात आता एका अभिनेत्रीने तिच्या आईला कोरोनाची लागण झाली आहे. पण कोणत्याही रुग्णालयात जागा शिल्लक नसल्याने त्यांना दाखल करता येत नाहीये. त्यामुळे तिने मदतीसाठी थेट त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे.

दिया और बाती फेम दीपिका सिंहची आई दिल्लीत राहात असून त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या दीपिका मुंबईत असून तिला तिच्या आईच्या तब्येतीविषयी काळजी वाटत आहे. दीपिकाने तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट करत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे मदत मागितली आहे. ती या व्हिडिओद्वारे सांगत आहे की, माझ्या आईचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून तिला त्या रिपोर्टची कॉपी द्यायला रुग्णालय तयार नाहीये आणि या रिपोर्टशिवाय त्यांना कोणतेही रुग्णालय भरती करून घेत नाहीये. माझी आई दिल्ली येथील पहाडगंज परिसरात राहाते. ती एकत्रित कुटुंबात राहात असून एका घरात ४५ जण राहातात. एका घरात इतके जण राहात असल्याने इतरांना देखील कोरोना व्हायरसची लागण व्हायची शक्यता आहे. माझ्या आजीला देखील श्वास घ्यायला त्रास होत आहे तर माझ्या वडिलांमध्ये देखील काही लक्षणं दिसत आहेत.

दीपिकाने केजरीवाल यांना विनंती केली आहे की, कृपया माझ्या कुटुंबियांना मदत करावी. मी खूप टेन्शनमध्ये आहे. काय करावे हेच मला कळत नाहीये. मी सध्या मुंबईत आहे. माझ्या आईला कोणतेच रुग्णालय दाखल करून घ्यायला तयार नाहीये. दिल्लीमधील लेडी हेरिटेज रुग्णालयात तिची तपासणी करण्यात आली आहे आणि तिचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. पण तिच्यावर ते इलाज करायला तयार नाहीयेत.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या