Join us

'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेत मोठा ट्विस्ट, भर लग्नातून अधिपती आणि अक्षरा झाले गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2023 16:07 IST

अक्षराचे लग्न ठरले आहे हे पाहून अधिपतीला फारच धक्का बसलेला होता. पण मालिकेत आता एक नवा ट्विस्ट येणार आहे.

झी मराठी वरील "तुला शिकवीन चांगलाच धडा" ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. भुवनेश्वरी, अधिपती आणि अक्षरा ही पात्र देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसतायत. ह्या मालिकेत प्रेक्षकांनी आतापर्यंत पहिले की अक्षरा बरोबर कमलचं लग्न ठरलं असते. ह्या लग्नाची पत्रिका अक्षराचे बाबा अधिपतीला देतात. अक्षराचे लग्न ठरले आहे हे पाहून अधिपतीला फारच धक्का बसलेला होता. दुसरीकडे भुवनेश्वरी ही अधिपतीचं लग्न ठरवते. दरम्यान मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे.

ऐन लग्नाच्या दिवशी अधिपती आणि अक्षरा आपापल्या घरातून गायब झाले आहेत. भुवनेश्वरी आणि अक्षराच्या आई वडिलांना जबरदस्त धक्का बसलाय. तेव्हा अक्षरा आणि अधिपती यांच्यावर काही संकट ओढवणार का? की ही असणार बहरणाऱ्या नात्याची नवी चाहूल? हे आपल्याला लवकरच कळेल. 

मालिकेत गेल्या काही दिवसांपासून अक्षराच्या लग्नाची लगबग पाहायला मिळत होती. अक्षरा कमलसोबत लग्न करणार असते. मात्र आता ऐन लग्नाच्या दिवशी अक्षरा आणि अधिपती गायब असल्याचे पाहून सगळ्यांना धक्का बसला आहे. आता मालिका नक्की कोणतं वळण घेत हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे.  

टॅग्स :झी मराठी