Join us  

गायत्री दातारचे हे क्यूट फोटो पाहून तुम्ही नक्कीच पडाल तिच्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2019 12:31 PM

तुला पाहते रे ही गायत्री दातारची पहिली मालिका असली तरी तिला या मालिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळत आहे.

ठळक मुद्देगायत्रीने तिच्या इन्स्टाग्रामला नुकतेच तिचे काही फोटोशूट्स मधील फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. हे फोटो पाहून तिचे फॅन्स तिची स्तुती करत आहेत. 

'तुला पाहते रे' ही मालिका सध्या तुफान गाजतेय. या मालिकेतील गायत्री दातार, शिल्पा तुळसकर आणि सुबोध भावे यांचा अभिनय प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या मालिकेत विक्रांतच्या पहिल्या पत्नीची म्हणजेच राजनंदिनीची एंट्री झाल्यापासून आता मालिकेत पुढे काय होणार याची उत्सुकता लोकांना लागलेली आहे. ही मालिका जुलै महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेणार असून या मालिकेचा शेवट काय होणार याविषयी प्रेक्षकांकडून तर्क वितर्क लावले जात आहेत.

तुला पाहते रे ही गायत्री दातारची पहिली मालिका असली तरी तिला या मालिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळत आहे. पुण्याच्या गायत्रीने या मालिकेतून प्रमुख भूमिका सादर करत टेलिव्हिजन क्षेत्रात पदार्पण केले आहे. पदार्पणातच तिला सुबोध भावे सोबत काम करण्याची संधी मिळाली आणि या संधीचं तिने सोनं केलं.

आज तिला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग मिळालेले असून तिचे फॅन्स तिला मोठ्या संख्येने सोशल मीडियावर फॉलो करत आहेत. गायत्री तिच्या खऱ्या आयुष्यातील, तिच्या फॅमिलीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

गायत्रीने तिच्या इन्स्टाग्रामला नुकतेच तिचे काही फोटोशूट्स मधील फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. हे फोटो पाहून तिचे फॅन्स तिची स्तुती करत आहेत. 

 

तुला पाहते रे या मालिकेतील इशा, विक्रम या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना भावल्या आहेत. या मालिकतील सुबोधचा अभिनय तर प्रेक्षकांना आवडत आहे. पण त्याचसोबत गायत्री दातारची ही पहिला मालिका असली तरी तिने तिच्या अभिनयातातून प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे खुद्द सुबोध भावेनेच सांगितले आहे.

सुबोधने सांगितले आहे की, येत्या जुलै महिन्यात तुला पाहते रे ही मालिका संपणार असून या मालिकेच्या कथानकाला आता काही रंगतदार वळणं मिळणार आहेत. या मालिकेची कथा ही येवढीच असल्याने ती ताणण्यात काहीही अर्थ नसल्याने ही मालिका जुलै महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 

 

टॅग्स :गायत्री दातारतुला पाहते रेसुबोध भावे