Join us  

सुबोध भावे इतकाच शिल्पा तुळसकरचा खऱ्या आयुष्यातील नवरा आहे हँडसम, पाहा त्याचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2019 11:48 AM

तुला पाहाते रे या मालिकेत शिल्पा सुबोध भावेची नायिका असल्याचे दाखवण्यात आले आहे. आज आम्ही तुम्हाला शिल्पाच्या खऱ्या आयुष्याविषयी सांगणार आहोत.

ठळक मुद्देशिल्पाचे लग्न झालेले असून तिला दोन मुले आहेत. शिल्पाचे लग्न विशाल शेट्टीसोबत झाले असून विवान आणि शैवा अशी त्यांच्या मुलांची नावे आहेत. विशाल हा हॉटेल बिझनेस मध्ये असून शिल्पाच्या इन्स्टाग्रामच्या प्रोफाईलमध्ये ती अनेकवेळी तिच्या पतीसोबतचे फोटो पोस्ट करते.

शिल्पाने तुळसकरने अनेक चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये काम केले आहे. तिने आजवर पलछीन, दिल मिल गये, संजीवनी, लेडीज स्पेशल यांसारख्या अनेक मालिकांद्वारे आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. तसेच डोंबिवली फास्ट, सनई चौघडे, शुगर सॉल्ट आणि प्रेम यांसारख्या चित्रपटांतील तिच्या भूमिका प्रेक्षकांना चांगल्याच आवडल्या आहेत. सध्या शिल्पा तुला पाहते रे या मालिकेत झळकत आहे. या मालिकेत ती साकारत असलेली राजनंदिनी ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. 

तुला पाहाते रे या मालिकेत शिल्पा सुबोध भावेची नायिका असल्याचे दाखवण्यात आले आहे. आज आम्ही तुम्हाला शिल्पाच्या खऱ्या आयुष्याविषयी सांगणार आहोत. शिल्पाचे लग्न झालेले असून तिला दोन मुले आहेत. शिल्पाचे लग्न विशाल शेट्टीसोबत झाले असून विवान आणि शैवा अशी त्यांच्या मुलांची नावे आहेत. विशाल हा हॉटेल बिझनेस मध्ये असून शिल्पाच्या इन्स्टाग्रामच्या प्रोफाईलमध्ये ती अनेकवेळी तिच्या पतीसोबतचे फोटो पोस्ट करते. तिचा पती हा हँडसम असून त्यांची जोडी शिल्पाच्या चाहत्यांना प्रचंड आवडते. 

विक्रांतची पहिली पत्नी राजनंदिनीची मालिकेत काही दिवसांपूर्वी एंट्री झाली असून तिच्या एंट्रीची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात होते. शीर्षक गीतात सावलीतून दिसणारा हा चेहरा आता सगळ्यांच्या समोर आला आहे. अभिनेत्री शिल्पा तुळसकर ही भूमिका साकारत असून तिचा या मालिकेतील लूक खूपच छान आहे.

सोशल मीडियावरही ‘तुला पाहते रे’ मधील राजनंदिनीची म्हणजेच शिल्पा तुळसकरची जोरदार चर्चा आहे. इतकंच नाही तर गुगल ट्रेण्ड्समध्येही राजनंदिनीचं नाव सर्वात जास्त सर्च केलं जात आहे. यावरून राजनंदिनीच्या एन्ट्रीची उत्सुकता आणि मालिकेची लोकप्रियता याचा अंदाज आपण लावू शकतो.

तुला पाहाते रे ही मालिका केवळ महाराष्ट्रातच नाही तर गोवा, छत्तीसगड, कर्नाटक आणि गुजरात यांसारख्या राज्यांतही लोकप्रिय आहे. मालिकेच्या टीझरमध्ये राजनंदिनीची झलक पाहायला मिळाली होती. पण आतापर्यंत मालिकेत तिची एण्ट्री झाली नव्हती. मालिकेत तिच्या येण्याने मालिकेची आणखीनच लोकप्रियता वाढली आहे.

टॅग्स :तुला पाहते रेसुबोध भावे