Join us  

तुझ्यात जीव रंगलामधील युवराज आहे या अभिनेत्याचा मुलगा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 6:30 AM

तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील युवराजचे वडील अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम करतात.

ठळक मुद्देझ्यात जीव रंगला ही श्रेयसची पहिलीच मालिका असून त्याच्या वडिलांचे नाव संजय मोहिते असून त्याने अनेक चित्रपट, नाटकांमध्ये काम केले आहे. त्याने काही नाटकांची निर्मिती देखील केली आहे.

झी मराठीवरील 'तुझ्यात जीव रंगला' या लोकप्रिय मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील व्यक्तिरेखांवर संबंध महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करतात. आता ही मालिका एका नव्या वेळेत प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेवर, यातील पात्रांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. रांगडा 'राणादा' आणि लाघवी पाठक बाई तर जणू प्रत्येकाच्या कुटुंबाचा भागच बनले. मालिकेत नेहमी राणा-अंजीलविरुद्ध कट-कारस्थाने करणाऱ्या नंदिता वहिनी म्हणजेच वहिनीसाहेब यांनी काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. ही भूमिका धनश्री काडगावकरने साकारली होती. धनश्रीने याआधी देखील अनेक मालिकांमध्ये काम केले असले तरी या भूमिकेमुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती.

धनश्रीच्या एक्झिटनंतर मालिकेने ५ वर्षांचा लीप घेतला असून आता या मालिकेत राणा आणि अंजलीची मुलगी राजलक्ष्मी आणि नंदिता व सुरजचा मुलगा युवराज या व्यक्तिरेखांची एंट्री झाली आहे. या मालिकेतील ही दोन्ही चिमुरडी मुले प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत आणि त्यातही युवराज प्रेक्षकांना चांगलाच भावला आहे. नंदिनीसारखाच तिचा हा मुलगा असून त्याचे ठसकेबाज बोलणे प्रेक्षकांना प्रचंड आवडते. त्याच्याविषयी काही खास गोष्टी आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. या युवराजचे खरे नाव श्रेयस मोहिते असून हा एका प्रसिद्ध अभिनेत्याचा मुलगा आहे. 

श्रेयसने अभिनयाचे धडे गिरवले असून त्याला अभिनयाची नेहमीच आवड होती. तुझ्यात जीव रंगला ही त्याची पहिलीच मालिका असून त्याने त्याच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून अभिनयक्षेत्रातील त्याच्या करियरला सुरुवात केली आहे.

त्याच्या वडिलांचे नाव संजय मोहिते असून त्याने अनेक चित्रपट, नाटकांमध्ये काम केले आहे. त्याने काही नाटकांची निर्मिती देखील केली आहे. त्याने फॉरेनची पाटलीण, वन रूम किचन, ऑन ड्युटी चोवीस तास यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये साहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली आहे. 

टॅग्स :तुझ्यात जीव रंगलाझी मराठी