Join us  

अजय देवगणच्या चित्रपटातील हा साईड डान्सर बनलाय आता प्रसिद्ध मराठी अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2019 2:56 PM

हा अभिनेता सध्या एका प्रसिद्ध मालिकेत मुख्य भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे.

ठळक मुद्देअजय देवगणचा सन ऑफ सरदार हा चित्रपट तुम्हाला आठवतोय का? या चित्रपटाच्या टायटल साँगमध्ये अजय देवगणच्या मागे डान्स करताना आपल्याला हार्दिकला पाहायला मिळत आहे. 

झी मराठीवरील 'तुझ्यात जीव रंगला' या लोकप्रिय मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील व्यक्तिरेखांवर संबंध महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करतात. आता ही मालिका एका नव्या वेळेत प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेवर, यातील पात्रांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. आता प्रेक्षकांना त्यांचा लाडका राणा दा पोलिसाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे.

तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील राणा दा प्रेक्षकांना प्रचंड आवडतो. या मालिकेत ही भूमिका हार्दिक जोशी साकारत असून त्याला या मालिकेमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली. तुमच्या लाडक्या राणा दा ने मालिकेत काम करण्यापूर्वी काही चित्रपटांमध्ये साईड डान्सरचे काम केले असल्याचे तुम्हाला माहीत आहे का? हो, हे खरे आहे. अजय देवगणचा सन ऑफ सरदार हा चित्रपट तुम्हाला आठवतोय का? या चित्रपटाच्या टायटल साँगमध्ये अजय देवगणच्या मागे डान्स करताना आपल्याला हार्दिकला पाहायला मिळत आहे. 

हार्दिक हा खूप चांगला अभिनेता असण्यासोबतच खूप चांगला डान्सर असल्याचे खूपच कमी जणांना माहीत आहे. त्याला नृत्याची आवड असल्याने त्याने अनेक चित्रपटांमध्ये साईड डान्सर म्हणून काम केले आहे. हार्दिकने तुझ्यात जीव रंगला या मालिकेच्याआधी अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच मकरंद अनासपुरेच्या रंगा पतंगा या चित्रपटात देखील त्याने काम केले आहे. पण त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता राणा दा या भूमिकेनेच मिळवून दिली. 

झी मराठीवरील 'तुझ्यात जीव रंगला' या लोकप्रिय मालिकेतील रांगडा 'राणादा' आणि लाघवी पाठक बाई तर जणू प्रत्येकाच्या कुटुंबाचा भागच बनले. मालिकेत नेहमी राणा-अंजीलविरुद्ध कट-कारस्थाने करणाऱ्या नंदिता वहिनी म्हणजेच वहिनीसाहेब यांनी नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. ही भूमिका धनश्री काडगावकरने साकारली होती. धनश्रीने याआधी देखील अनेक मालिकांमध्ये काम केले असले तरी या भूमिकेमुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती.

धनश्रीच्या एक्झिटनंतर मालिकेने पाच वर्षांचा लीप घेतला असून आता या मालिकेत राणा आणि अंजलीची मुलगी राजलक्ष्मी आणि नंदिता व सुरजचा मुलगा युवराज या व्यक्तिरेखांची एंट्री झाली आहे. या मालिकेतील ही दोन्ही चिमुरडी मुले प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत.

टॅग्स :तुझ्यात जीव रंगलाहार्दिक जोशी